शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

४ तालुक्यांत पावसाची जोरदार हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 00:52 IST

जालना शहर व परिसरात झालेल्या पहाटे जोरदार पाऊस झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना शहर व परिसरात झालेल्या पहाटे जोरदार पाऊस झाला. त्यामुळे शहरात सर्वत्र पाणीच पाणी झाले. जाफराबाद, जालना, मंठा, भोकरदन, तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे अनेक ठिकाणी नदी-नाल्यांना पूर आला होता. परतूर, बदनापूर, अंबड व घनसावंगी तालुक्यात हलका पाऊस झाला.रविवारी मध्यरात्री एकच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. सुमारे दीडतास मुसळधार पाऊस झाला. त्यानंतर पहाटे सहा वाजेपर्यंत पावसाची संततधार सुरूच होती. या पावसामुळे शहरातील सखल भाग जलमय झाला. टाऊन हॉल परिसरात नाल्याचे पाणी रस्त्यावर आल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले. शनिमंदिर ते सरस्वती भुवन शाळेपर्यंत खोदलेला रस्ता पावसाच्या पाण्याने तुडुंब भरला. अंतर्गत भागातील अनेक रस्त्यांवर पाणी साचल्याने नागरिकांची गैरसोय झाली.दरम्यान, या आठवड्यात झालेल्या दमदार पावसामुळे कुंडलिका नदीवरील स्व. बाळासाहेब ठाकरे स्मृती बंधाºयावरून पाणी वाहत आहे. सीना नदीही खळखळून वाहत आहे. जालना तालुक्यातही बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला.दरम्यान, सोमवारी सकाळी प्र्राप्त आकडेवारीनुसार जालना तालुक्यात २९. ३८, बदनापूरमध्ये १६. ४०, भोकरदनमध्ये २३.३८, जाफराबादमध्ये ३६.४० परतूरमध्ये १२.६०, मंठ्यात ४९.५०, अंबडमध्ये १.४३, घनसावंगी २.१४ तर परतुरात १२.६० मिलिमीटर पाऊस झाला. अंबड, घनसावंगी , बदनापूर व परतूर तालुक्यात पावसाचा जोर कमी राहिला. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण सरासरीच्या ५५३.०० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.