शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

जोरदार पावसाने मोठी विद्युत हानी

By admin | Updated: June 11, 2014 00:52 IST

औरंगाबाद : हत्ती वाहनावरून मृग नक्षत्राला सुरुवात झाली आणि सोमवारी रात्री वादळी वाऱ्यासह शहरात पावसाने जोरदार सलामी दिली.

औरंगाबाद : हत्ती वाहनावरून मृग नक्षत्राला सुरुवात झाली आणि सोमवारी रात्री वादळी वाऱ्यासह शहरात पावसाने जोरदार सलामी दिली. शहरातील २२ ठिकाणची झाडे कोलमोडून पडली. १२ विद्युत खांबांनी रस्त्यावर लोटांगण घातले. झाडे पडल्याने ८ ठिकाणच्या विद्युत वाहिन्या तुटल्या. सुदैव एवढेच की यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. विद्युत खांब व वाहिन्यांमुळे शहरात सुमारे ३० लाख रुपयांचे नुकसान झाले, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. विद्युतहानीमुळे सिडको एन-३, एन-४ तसेच एन-८, बालाजीनगर आदी परिसरातील विद्युत पुरवठा खंडित झाला होता. विद्युतअभावी चिकलठाणा औद्योगिक वसाहतातील ‘ई’ सेक्टरमध्ये असलेल्या २५ लहान-मोठ्या कारखान्यांतील कामे रखडली होती. सोमवारी ९ जून रोजी रात्री अचानक चोहूबाजूंनी ढग दाटून आले आणि ८.३० वाजेदरम्यान वादळी वाऱ्यासह धो-धो पाऊस पडला. अचानक आलेल्या पावसाने साऱ्यांची तारांबळ उडाली. पावसाचे टपोरे थेंब अंगाला सपासपा लागत होते. दुचाकीवाहनधारकांना याचा जोरदार फटका बसला. अवघ्या चार ते पाच मिनिटांत आनंदनगरी रिकामी झाली. जिथे आडोसा मिळेल तिथे लोक उभे राहिले होते. पावसापासून बचाव करण्यासाठी क्रांतीचौक उड्डाणपूल, सेव्हनहिल उड्डाणपूल, संग्रामनगर उड्डाणपुलाखाली अनेक वाहनधारक उभे होते. जीटीएलने केलेल्या सर्व्हेनुसार शहरात २२ ठिकाणी झाडे पडली. त्यातील १२ झाडे विद्युत वाहिन्यांवर कोसळली. ठिकठिकाणच्या ८ विद्युत वाहिन्या तुटून खाली पडल्या. १८ ठिकाणचे विद्युत खांब पडले. त्यात काही खांब वाकले. सिडकोतील एलआयसी आॅफिस रोडवर तीन मोठी झाडे पडल्याने आज सकाळी या रोडवरील वाहतूक ठप्प झाली होती. मनपाने त्वरित ही झाडे कापून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला. याशिवाय सिडकोतील किटली गार्डन, हर्सूल टी-पाइंट, किलेअर्क, अदालत रोड आदी भागातही झाडे पडली. एलआयसी कार्यालयासमोरील तीन खांब, जालना रोडवर एक स्ट्रीट लाईट, शहाबाजार, हर्सूल टी-पॉइंट परिसरातील ३ खांब, सिडको एन-४ तसेच अन्य ठिकाणचे विद्युत खांब वाकले. विद्युत पुरवठा खंडितसिडको एन-३ व एन-४ परिसरातील विद्युत पुरवठा सोमवारी रात्रीपासून खंडित झाला होता. या भागातील खांब वाकल्याने तेथील दुरुस्ती करण्यात आली व सायंकाळी विद्युत पुरवठा सुरळीत सुरू झाला. एमजीएमच्या आसपासचा परिसर, बालाजीनगर, एन-८ परिसर, एन-१ परिसरातील लाईट गुल झाली होती. येथेही सायंकाळपर्यंत विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला. चिकलठाणा औद्योगिक वसाहतीतही काही ठिकाणी विद्युत वाहिन्या तुटल्यामुळे ‘ई’ सेक्टरमधील विद्युत पुरवठा खंडित झाला होता. येथे इंजिनिअरिंग वर्कशॉप, केमिकल्स फॅक्टरी, प्रिंटिंग प्रेस आदी ३० युनिट आहेत. लाईट नसल्याने दिवसभर येथील काम बंद होते.