शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

हृदयरोग विभागाला सर्जन मिळेना

By admin | Updated: September 26, 2014 00:11 IST

औरंगाबाद : घाटी रुग्णालयातील हृदयरोग आणि उरोशल्यचिकित्सा विभागातील (सीव्हीटीएस) सर्जन एक वर्षापूर्वी राजीनामा देऊन निघून गेला.

औरंगाबाद : घाटी रुग्णालयातील हृदयरोग आणि उरोशल्यचिकित्सा विभागातील (सीव्हीटीएस) सर्जन एक वर्षापूर्वी राजीनामा देऊन निघून गेला. तेव्हापासून तेथील बायपाससह अन्य महत्त्वाच्या सर्जरी ठप्प झाल्या आहेत. या विभागाला सर्जन मिळावा, यासाठी घाटी प्रशासन पाठपुरावा करण्यात कमी पडले आहे. त्याचा फटका सामान्य रुग्णांना सहन करावा लागत असून, त्यांना उपचारासाठी खाजगी दवाखान्यांची दारे ठोठवावी लागत आहेत.मराठवाड्यातील पहिला शासकीय हृदयरोग आणि उरोशल्यचिकित्सा विभाग पाच वर्षांपूर्वी घाटीत सुरू झाला. तेथे अत्याधुनिक स्वतंत्र आॅपरेशन थिएटर, आयसीयू, महिला आणि पुरुष रुग्णासाठी स्वतंत्र वॉर्ड आहे. हृदयरोगतज्ज्ञ, प्रशिक्षित पॅरामेडिकल स्टाफ आणि तंत्रज्ञांची स्वतंत्रे पदे मंजूर आहेत.विभाग कार्यान्वित झाल्यामुळे तेथे रोज दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तेथील हृदयरोग विभागात तज्ज्ञ कार्यरत असल्याने तेथे नियमित अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी केल्या जात आहेत. मात्र, अनेक रुग्ण असे असतात की, त्यांच्यावर बायपाससारख्या मोठ्या सर्जरी करण्याचा सल्ला दिलाजातो. अशा रुग्णांसाठी घाटीतील सीव्हीटीएस विभागात सर्जरी होऊ शकतात. ही सर्जरी करण्यासाठी तेथे डॉक्टरच नाही. दोन वर्षांपूर्वी डॉ. महेश चौधरी हे सर्जन राजीनामा देऊन निघून गेले. त्यानंतर एक वर्षानंतर भरत सोनी नावाचे सर्जन घाटीत दाखल झाले होते. येथे रुजू झाल्यानंतर प्रशासनाने त्यांना हव्या त्या सुविधा दिल्या. त्यांनीही सर्जरी करण्याचा धडाकाच सुरू केला. मात्र, अचानक राजीनामा देऊन ते निघून गेले. डॉ. सोनी गेल्यापासून तेथील सर्जरी ठप्प झाल्या. त्यांच्याऐवजी नवीन सर्जन मिळावा, यासाठी प्रशासन मात्र फारसे गंभीर नाही. परिणामी, एक वर्षानंतरही तेथील सर्जनचे पद रिक्त आहे. मानसेवी सर्जन डॉ. मनोहर काळबांडे यांचा कालावधी संपल्यानंतर त्यांना पुढे संलग्नता देण्यात आली नाही, त्याचाही फटका रुग्णसेवेलाबसला.