शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

प्रशासक नेमण्यासंदर्भात आज सुनावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 00:54 IST

महानगरपालिकेवर प्रशासक नेमावा यासाठी दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर ४ एप्रिल रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सुनावणी होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महानगरपालिकेवर प्रशासक नेमावा यासाठी दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर ४ एप्रिल रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सुनावणी होणार आहे. तसेच शहरवासीयांना किमान मूलभूत सोयी-सुविधा पुरविण्यात संपूर्णपणे अपयशी ठरलेल्या महापालिकेच्या विरोधात दाखल झालेल्या २१ जनहित याचिकांवर मंगळवारी झालेल्या एकत्रित सुनावणीत खंडपीठाने मनपाला अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. मनपाच्या कारभारावरही ताशेरे ओढण्यात आले.कायद्याने जी कर्तव्ये करणे बंधनकारक आहे ते कर्तव्ये पार पाडण्यात महानगरपालिकेला अपयश आले आहे. प्रत्येक प्रश्नासाठी, समस्यांसाठी, हक्कासाठी नागरिकांना न्यायालयाचा दरवाजा ठोठवावा लागतो आहे. त्यामुळे मनपावर प्रशासक नेमण्यात यावा, अशी विनंती करणाऱ्या याचिकेवर बुधवारी सुनावणी होणार आहे.महापालिकेच्या विरोधातील २१ जनहित याचिकांवर मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात न्या. एस.एस. शिंदे आणि न्या. एस.एम. गव्हाणे यांच्यासमोर सुनावणी झाली. यात खराब रस्ते, अपुरा पाणीपुरवठा, ड्रेनेज व्यवस्था, पथदिवे, स्वच्छ वातावरण, पार्किंग, बेकायदा बांधकाम आदींच्या संदर्भातील याचिकांचा समावेश आहे.मंगळवारच्या सुनावणीत उत्तरानगरीच्या पाणीप्रश्नावर म्हणणे सादर करण्यात आले. या वसाहतीतून वर्षाला १८ लाख रुपयांचे कर मनपा वसूल करते. मात्र, या परिसरातला पाणीपुरवठा करण्यासाठी पाईपलाईनवर मनपा १७ लाख रुपये खर्च करीत नाही. यामुळे येथील पाणीपुरवठ्याचा प्रश्न रेंगाळला आहे. उल्लेखनीय म्हणजे, खंडपीठाने देखील हे काम करण्यासंदर्भात आदेश देऊनही ते झाले नसल्याकडे खंडपीठाचे लक्ष वेधण्यात आले. यासंदर्भातील याचिकेवर शुक्रवारी सुनावणी होणार आहे.सुखना नदीपात्रात अतिक्रमणे झाली आहेत. नदीपात्रात ड्रेनेज व कारखान्यांमधील रसायनयुक्त पाणी सोडले जाते. यामुळे पर्यावरणाची मोठी हानी होत आहे. असा मुद्दा खंडपीठासमोर उपस्थित करण्यात आला. या आणि अशाच इतर अनेक मुद्यांवर मंगळवारी न्यायालयासमोर सविस्तर म्हणणे मांडण्यात आले. सुनावणीत याचिकाकर्त्यांच्या वतीने अ‍ॅड. प्रदीप देशमुख, अ‍ॅड. देवदत्त पालोदकर, अ‍ॅड. अजित काळे, अ‍ॅड. एन.एल. जाधव, तर मनपातर्फे अ‍ॅड. जयंत शहा, अ‍ॅड. संभाजी टोपे आणि अ‍ॅड. अमित वैद्य, राज्य शासनातर्फे अ‍ॅड. अमरजितसिंह गिरासे आणि अ‍ॅड. सिद्धार्थ यावलकर, केंद्र शासनातर्फे अ‍ॅड. संजीव देशपांडे यांनी काम पाहिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयMunicipal Commissioner Aurangabadमहानगरपालिका आयुक्त औरंगाबाद