शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समितीच्या जागेच्या वादासंबंधी सुनावणी पूर्ण

By admin | Updated: April 23, 2016 01:24 IST

औरंगाबाद : औरंगाबाद उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जागेसंबंधी दाखल करण्यात आलेल्या तीन याचिकांची सुनावणी पूर्ण झाली.

औरंगाबाद : औरंगाबाद उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जागेसंबंधी दाखल करण्यात आलेल्या तीन याचिकांची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. ए. व्ही. निरगुडे व न्या. व्ही. एल. आंचलिया यांच्यासमोर पूर्ण झाली. खंडपीठाने या तिन्ही याचिकांचा निकाल राखून ठेवला आहे. तत्कालीन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे बाजार समितीसाठी संपादित करण्यात आलेल्या गट क्रमांक १३ मधील जागेसंबंधीचा वाद २००१ पासून प्रलंबित होता. उपरोक्त जमीन संपादनातून वगळावी असा अर्ज प्रलंबित होता. हा अर्ज श्रीनिवास खटोड व इतर पाच जणांनी दाखल केला होता. १४ आॅगस्ट २०१४ रोजी मंत्रालयात सुनावणी झाली असता, मंत्र्यांनी नवीन भूसंपादन कायद्याचे कलम २४ (२), (७) प्रमाणे जुना भूसंपादन अवार्ड रद्द केला. त्या नाराजीने बाजार समितीने सचिवांमार्फ त याचिका दाखल केली. चिरंजीलाल बजाज व इतरांनी तत्कालीन जिल्हाधिकारी वीरेंद्रसिंग यांच्याकडे गट क्रमांक १० व १२ संबंधी प्रकरण दाखल केले. नवीन भूसंपादन कायद्याचे कलम २४ (२) नुसार भूसंपादनाचे प्रकरण रद्द करावे, अशी मागणी केली. वीरेंद्रसिंग यांनी २६ जून २०१५ रोजी जुन्या कायद्यानुसार जी जमीन संपादित केली, ती नवीन कायद्यानुसार रद्द झाल्याचे जाहीर केले. या तिन्ही याचिकांवरील सुनावणी पूर्ण झाली. बाजार समितीच्या म्हणण्यानुसार यापूर्वी जुन्या कायद्याप्रमाणे निवाडा अंतिम झाला होता. त्यासंदर्भात विशेष भूसंपादन अधिकाऱ्यांकडे निवाड्याची रक्कम जमा केली होती. परंतु सुरुवातीला शासनाच्या आदेशान्वये व नंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये ‘जैसे थे’ परिस्थिती असल्याने बाजार समितीला जागेचा ताबा घेता आला नाही. दरम्यान, १ जानेवारी २०१४ पासून नवीन भूसंपादन कायदा अस्तित्वात आला. त्यामुळे नवीन कायद्यानुसार झालेली प्रक्रिया रद्द होणार नाही. उपरोक्त कलम रद्द करण्याची विनंती करण्यात आली आहे. समितीच्या वतीने अ‍ॅड. सिद्धेश्वर ठोंबरे काम पाहत असून, प्रतिवादीतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ प्रवीण शहा आणि ज्येष्ठ विधिज्ञ विनायक दीक्षित काम पाहत आहेत.