शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: आझाद मैदान परिसरात तणावाची स्थिती, आंदोलकांनी वाट अडवली; पोलिसांनी अतिरिक्त कुमक मागवली
2
फक्त ५० मिनिटे उरली! आझाद मैदान रिकामे करा; हायकोर्टाच्या आदेशानंतर पोलीस एक्शन मोडमध्ये
3
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: २४ तासांची परवानगी, मग आता तुम्ही कोणत्या अधिकारात तिथे बसला आहात; हायकोर्टाचा सवाल
4
"पूर नव्हे, हा तर देवाचा आशीर्वाद"; पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी जनतेला दिला अजब सल्ला! म्हणाले...
5
'आंदोलक रस्त्यावर नाचताहेत म्हणून तुम्ही न्यायमूर्तींना पायी कोर्टात जायला भाग पाडू शकत नाही'; उच्च न्यायालयाने सरकारला झापले
6
'सरकारचा एकही प्रतिनिधी मनोज जरांगे पाटलांना भेटायला आला नाही,' रोहित पवारांची टीका
7
सेबीचा नवा नियम! F&O ट्रेडिंगमध्ये १ ऑक्टोबरपासून पोझिशन लिमिट वाढणार; लहान गुंतवणूकदारांना फायदा
8
स्वार्थी ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'नंतरही भारताची अर्थव्यवस्था 'बम-बम'! ग्रोथ पाहून पंतप्रधान मोदीही खूश; स्पष्टच बोलले...
9
“बस… जरांगे आता थांबा! आंदोलन संपवून सरकारला सहकार्य करा, नामुष्की टाळा”; कुणी दिला सल्ला?
10
'या' देशात भाड्याने मिळते पत्नी; लग्न करून एकत्रही राहू शकता, पण मोजावे लागतील 'इतके' पैसे!
11
"काँग्रेसच्या स्टेजवरून माझ्या आईला शिवी दिली, हा अपमान..."; पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले भावूक
12
Ganesh Visarjan: गौरी-गणपतीच्या निरोपासाठी जय्यत तयारी
13
बुरख्यातली गर्लफ्रेंड निघाली मुलगा! एकत्र प्रवास करूनही ओळखू शकला नाही बॉयफ्रेंड; पुढचं ऐकून व्हाल हैराण
14
अवनीत कौरने विराट कोहलीच्या इंस्टाग्राम पोस्ट लाइकवर सोडलं मौन, म्हणाली - "मी कधीच विसरत नाही..."
15
"अकाली एक्झिट वगैरे शब्द...", प्रिया मराठेच्या निधनानंतर अभिजीतची भावुक पोस्ट
16
Mumbai: डहाणूच्या चंद्रसागर खाडीत अवतरले पक्षीवैभव
17
"लक्षात ठेवा तुमच्याही लोकांना, नेत्यांना महाराष्ट्रात यायचं आहे"; मनोज जरांगे मुख्यमंत्र्यांचं नाव घेऊन काय बोलले?
18
मतचोरीच्या ‘ॲटम बॉम्ब’नंतर आता फुटेल ‘हायड्रोजन बॉम्ब’; राहुल गांधींचा इशारा
19
पीटर नवारोंनी पुन्हा गरळ ओकली, मोदी-पुतिन-जिनपिंग यांच्या भेटीवर केले मोठे विधान
20
बलात्काराचा आरोप असलेला AAP आमदार गोळीबार करत पोलिसांच्या तावडीतून पळाला...

आरोग्य विभागाला रिक्तपदांचा आजार

By admin | Updated: July 9, 2014 00:08 IST

हिंगोली : जिल्ह्यातील आरोग्य विभागातील तब्बल ९ प्रमुख अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्याने नियमित कामकाजावर त्याचा परिणाम होत आहे. त्यामुळे या विभागावरच उपचाराची गरज निर्माण झाली आहे.

हिंगोली : जिल्ह्यातील आरोग्य विभागातील तब्बल ९ प्रमुख अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्याने नियमित कामकाजावर त्याचा परिणाम होत आहे. त्यामुळे या विभागावरच उपचाराची गरज निर्माण झाली आहे. सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या आरोग्य विभागाकडे शासनाने गेल्या काही वर्षांपासून दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. हिंगोली जिल्ह्याच्या ठिकाणी आरोग्याशी संबंधित विविध विभागातील पदे सातत्याने रिक्त राहत आहेत. त्यामध्ये जिल्हा परिषदेतील अतिरिक्त आरोग्य अधिकारी, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी, साथरोग वैद्यकीय अधिकारी, सांख्यिकी आरोग्य अधिकारी, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी, जिल्हा हिवताप अधिकारी, जिल्हा क्षयरोग अधिकारी, सहाय्यक संचालक कृष्टरोग या तब्बल ९ अधिकाऱ्यांच्या पदांचा समावेश आहे. ही रिक्त पदे भरण्याची मागणी वेळोवेळी शासनाकडे करण्यात आली; परंतु शासनस्तरावरून त्याकडे लक्ष देण्यात आले नाही. त्यामुळे या पदाचा पदभार अन्य अधिकारी गेल्या अनेक वर्षांपासून सांभाळत आहेत. परिणामी या पदाला व या कार्यालयांतर्गत येणाऱ्या कामांना न्याय देता येईनासा झाला आहे. जिल्हा परिषदेतील अतिरिक्त आरोग्य अधिकाऱ्यांचे पद गेल्या दोन वर्षांपासून रिक्त आहे. तर साथरोग अधिकाऱ्यांची पदे गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त आहे. हे पद भरले गेले नसल्याने निर्माण होणाऱ्या साथरोगांवर उपाययोजना करण्यासाठी तात्काळ निर्णय होत नाही. परिणामी अनेक वेळा जनतेच्या जीवाला धोका निर्माण होतो; परंतु शासन मात्र याकडे गांभिर्याने पाहण्यास तयार नाही. (जिल्हा प्रतिनिधी)आरोग्य राज्यमंत्र्यांकडून अपेक्षा राज्याच्या आरोग्य राज्यमंत्री फौजिया खान बुधवारी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात त्यांनी आरोग्य विभागाचा आढावा घेऊन रिक्त पदे त्वरीत भरण्यासंदर्भात निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा जनतेकडून व्यक्त होत आहे. काही महिन्यांपूर्वी राज्यमंत्री फौजिया खान जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्या होत्या; परंतु त्यांनी या प्रश्नाकडे लक्ष घातले नव्हते. आरोग्य विभागांतर्गत येणाऱ्या तब्बल ९ अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्याने जनतेला समाधानकारक सेवा मिळेना. रिक्त पदे भरण्याबाबत तातडीने निर्णय घेण्याची गरज.