परभणी: जिल्हा पोलिस दलातील पोलिस अधिकारी व कर्मचार्यांच्या कुटुंबियांसाठी १८ नोव्हेंबर रोजी आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. यात २१८ जणांची तपासणी करण्यात आली.येथील पोलिस मुख्यालयातील पोलिस रुग्णालयात हे शिबीर पार पडले. अप्पर पोलिस अधीक्षक नियती ठाकर, सहाय्यक पोलिस अधीक्षक प्रणय अशोक आणि उपविभागीय पोलिस अधिकारी लता फड यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिराला प्रारंभ झाला. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रकाश डाके यांच्या हस्ते शिबिराचे उद््घाटन झाले. याप्रसंगी पोलिस दवाखान्याचे डॉ.बी.टी.धूतमल यांच्यासह राखीव पोलिस निरीक्षक पंडित राठोड, ग्रामीण पोलिस पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शर्मा, ताडकळस पोलिस निरीक्षक नाचण, दैठणा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक किशोर तरोणे आदींची उपस्थिती होती. शिबिरामध्ये २१८ पोलिस कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांची तपासणी करण्यात आली. मधुमेह, हृदयरोग, ईसीजी, रक्तातील हिमोग्लोबीन तपासणी, ब्लड ग्रुप, महिलांच्या गर्भाशयाचा कॅन्सर तपासणी आदी तपासण्या करण्यात आल्या. डेंग्यू व मलेरियासदृश्य तापाचे ९८ नमुने तपासण्यात आले. चाळीस वर्षांच्या वर वय असणार्या १२५ पोलिस अधिकारी, कर्मचारी व कुटुंबियांची रक्त व शुगर तपासणी करण्यात आली. डॉ. बनसोडे, डॉ. प्रवीण संगवे, डॉ. सालेहा कौसर, डॉ. मोरे, डॉ. हुसेन, डॉ. जानापूरकर यांनी डोळे, रक्त, त्वचारोग यासह विविध आजारांची तपासणी केली. शिबीर यशस्वीतेसाठी पोलिस दवाखान्यातील कराड व त्यांच्या सहकार्यांनी परिश्रम घेतले.(/प्रतिनिधी)
पोलिस कर्मचार्यांची आरोग्य तपासणी
By admin | Updated: November 19, 2014 13:22 IST