शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य केंद्रच सेवकाच्या माथी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 00:06 IST

जिल्ह्यातील सर्वच जि. प. आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी वर्ग १, २, गट -ब ची पदे रिक्त असल्याने अनेकदा आरोग्य केंद्रांची धुरा केवळ सेवकांनाच सांभाळण्याची वेळ येत आहे. काही ठिकाणी तर सेवकही नसल्याने कर्मचाºयांना उपकेंद्राला कुलूप लावून पदभार दिलेल्या ठिकाणी धाव घेतल्याशिवाय पर्याय नसल्याचे विदारक चित्र सध्या पहावयास मिळत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यातील सर्वच जि. प. आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी वर्ग १, २, गट -ब ची पदे रिक्त असल्याने अनेकदा आरोग्य केंद्रांची धुरा केवळ सेवकांनाच सांभाळण्याची वेळ येत आहे. काही ठिकाणी तर सेवकही नसल्याने कर्मचाºयांना उपकेंद्राला कुलूप लावून पदभार दिलेल्या ठिकाणी धाव घेतल्याशिवाय पर्याय नसल्याचे विदारक चित्र सध्या पहावयास मिळत आहे.जिल्ह्यात आरोग्य विभागाची मोठ्या प्रमाणात पदे रिक्त आहेत. त्यामुळे वैद्यकीय अधिकाºयांसह आरोग्य कर्मचाºयांनाही दोन-दोन ठिकाणचा पदभार सोपविण्यात आला आहे. त्यामुळे त्यांचे एकाही ठिकाणी काम पूर्णत्वास जात नसल्याचे चित्र आहे. एकीकडे कर्मचारी प्रवास करण्यातच हैराण आहेत. तर दुसरीकडे रुग्ण कर्मचाºयांची प्रतीक्षा करण्यात हैराण आहेत. त्यामुळे कोणाचा कोणाला मेळ लागत नसल्याचे दिसत आहे. सध्यास्थितीत वर्ग १ चे अति. जिल्हा आरोग्य आधिकारी १, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधीकारी १, वैद्यकीय अधीकारी वर्ग २ कळमनुरी १ प्रा. आ. केंद्र भांडेगाव १, फाळेगाव १, नर्सी नामदेव १, पांगरा शिंदे १, हयातनगर १, कापडसिंगी २, कवठा २, साखरा २, गोरेगाव २, जिल्हा प्रशिक्षण केंद्र हिंगोली १ असे एकूण १६ वैद्यकीय अधिकाºयांची रिक्त पदे आहेत. तर वैद्यकीय आधिकारी गट - बमध्ये नरवाडी येथील आयुवेर्दिक दवाखान्यातील १, औंढा नागनाथ तालुक्यातील मेथा १, कळमनुरी तालुक्यातील वारंगा फाटा १ असे एकूण तीनही पदे रिक्तच आहेत. तर जि. प. तील आरोग्य विभागातही एकूण ३ पदे रिक्त आहेत. यामध्ये प्रशासकीय अधिकारी १, सांख्यिकी अधिकारी १ आणि जिल्हा माध्यम व प्रसिद्ध अधिकारी १ अशी एकूण ३ पदे रिक्त आहेत. त्यामुळे एकूणच कारभारात अडचणी येत आहेत.