शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य कर्मचाऱ्यांना मुख्यालयसक्ती

By admin | Updated: March 17, 2016 00:04 IST

हिंगोली : जिल्ह्यात ग्रामीण भागात दौरे केल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे आर्दड यांना ग्रामसेवक व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या प्रामुख्याने तक्रारी ऐकायला मिळाल्या.

हिंगोली : जिल्ह्यात ग्रामीण भागात दौरे केल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे आर्दड यांना ग्रामसेवक व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या प्रामुख्याने तक्रारी ऐकायला मिळाल्या. त्यामुळे त्यांनी ग्रामसेवक व आरोग्य अधिकारी-कर्मचाऱ्यांना मुख्यालयसक्ती केली आहे.डॉक्टर मुख्यालयी राहात नसल्याची मोठी तक्रार कायम गावपातळीवर असते. शिवाय येणाऱ्या तक्रारींतही हा ओघ असतो. त्यातच ग्रामसेवक तर गावात फिरकतही नसल्याच्या तक्रारी जागोजाग ऐकायला मिळाल्या. एकापेक्षा जास्त सज्जे असल्याने दुसऱ्या गावांची नावे सांगून ग्रामसेवक वेळ मारून नेत असल्याचे चित्र पहायला मिळत होते. त्यातच औंढा तालुक्यातील तुर्कपिंप्रीत तर गंभीर तक्रारी होत्या. त्यामुळे सीईओंनी आता एकापेक्षा जास्त सज्जे असलेल्या ग्रामसेवकांसाठी वेळापत्रकच तयार करण्याचा आदेश गटविकास अधिकाऱ्यांना दिला. या वेळापत्रकावर सीईओ आर्दड यांच्या स्वाक्षरीने अंमलबजावणी होणार आहे. ठरवून दिलेल्या वाराला दिलेल्या वेळेत संबंधित ग्रामसेवक त्या गावात न आढळल्यास त्याच्यावर कारवाई केली जाणार आहे. यासाठी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायतचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी यांच्यामार्फत वेळोवेळी तपासण्या होणार आहेत. या अधिकाऱ्यांनीही किती तपासण्या कराव्यात, याचे बंधन घालण्यात येणार आहे. अशाच पद्धतीने आरोग्य विभागातील डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांचीही तपासणी होणार आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी आदींनी ही तपासणी करायची आहे. याशिवाय अधून-मधून खुद्द मुख्य कार्यकारी अधिकारी दौऱ्यावर जावून तपासणी करणार आहेत. यामध्ये कसूर केल्यास थेट कारवाईचे हत्यावर उपसले जाणार आहे.