नांदेड : येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय पोलिस क्रीडा स्पर्धेत सांघिक गटात पोलिस मुख्यालय व वैयक्तिक गटात रमेश लादे व रुक्मिणी कानगुले या खेळाडूंनी विजेतेपद पटकावले.२५ ते २७ जून दरम्यान पार पडलेल्या जिल्हास्तरीय पोलिस क्रीडा स्पर्धेचा बक्षीस वितरण विशेष पोलिस महानिरीक्षक जगन्नाथ यांच्या हस्ते पार पडला. जिल्हा पोलिस अधीक्षक परमजीतसिंह दहिया, आ. ओमप्रकाश पोकर्णा, अप्पर पो. अधीक्षक तानाजी चिखले, नगरसेवक नवल पोकर्णा आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन प्रा. संतोष देवराये यांनी केले. जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेचा निकाल असा- फुटबॉल, बॉस्केटबॉल, कबड्डी पुरुष पोलिस मुख्यालय प्रथम, नांदेड शहर द्वितीय, व्हॉलिबॉल नांदेड शहर प्रथम, पोलिस मुख्यालय द्वितीय, खो-खो कंधार विभाग प्रथम, भोकर विभाग द्वितीय. मैदानी स्पर्धा १०० मी. धावणे- प्रथम-बाळासाहेब कवळे, द्वितीय- अंगद सूर्यवंशी, तृतीय गंगाधर सूर्यवंशी. ८०० मीटर धावणे- प्रथम रमेश लादे, द्वितीय : अशो गाडे, तृतीय नारायण आवटे. मैदानी स्पर्धा मैदानी महिला गट१०० मी., २०० मी., ४०० मी., ८०० व १५०० मी. धावणे प्रथम रुख्मिनी कानगले (प्रथम), द्वितीय- अनिता गज्जलवार (द्वितीय), थाळीफेक- प्रथम- रेणुका देवणे, द्वितीय - वंदना घुले. बॉक्सिंग (७५ किलो वजन)प्रथम- लक्ष्मण फुलारी, द्वितीय- नितीन धुळगंडे , तृतीय- संजीव जिंकलवाड.कुस्ती- ७५ किलो गटप्रथम- हनमंत इंगोले, द्वितीय- शिवकुमार स्वामी, तृतीय- संजय जिंकलवाड. जलतरण -५० मीटर फ्री स्टाईल प्रथम शिवानंद हंबर्डे, द्वितीय-माधव उफडे, तृतीय- गणेश शेळके. या स्पर्धेत पंच म्हणून गुरदीपसिंह संधू, महेमुदा खान, जितेंद्र दयालसिंघ, जितेंद्रसिंघ साहू, प्रलोभ कुलकर्णी, रामदास आलेवार, शेख शबीर, प्रलोभ कुलकर्णी, कपिल सोनकांबळे, संतोष देवराये, संतोष सोनसळे आदींनी सहकार्य केले. (क्रीडा प्रतिनिधी)
क्रीडा स्पर्धेत सांघिक गटात मुख्यालयास विजेतेपद
By admin | Updated: June 28, 2014 01:17 IST