अंबाजोगाई : विहिरीचे खोदकाम करत असताना क्रेनचे रिकामे टोपले डोक्यात पडून मजूर ठार झाला. ही घटना तालुक्यातील वाघाळा शिवारात शनिवारी घडली.विक्रम कोंडीबा शिंपले (वय ५०, रा. कुंबेफळ ता. अंबाजोगाई) असे मयताचे नाव आहे. ते वाघाळा शिवारातील एका शेतात विहिरीचे खोदकामावर काम करीत होते. याच सुमारास क्रेनचे रिकामे टोपले त्यांच्या डोक्यावर पडले. त्यांना अंबाजोगाई येथील स्वाराती रूग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. याप्रकरणी ग्रामीण ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. या घटनेने कुंबेफळ परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. (वार्ताहर)
टोपले डोक्यात पडून मजूराचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2017 23:05 IST