उस्मानाबाद : जिल्ह्यातील आठही नवनिर्वाचित नगराध्यक्ष सोमवारी पदभार स्वीकारणार आहेत. त्यानंतर पहिली सर्वसाधारण सभा बोलावून उपनगराध्यक्ष व स्वीकृत सदस्यांच्या निवडी होणार आहेत. जिल्ह्यातील आठ नगरपालिकांच्या जुन्या पदाधिकाऱ्यांची मुदत संपली नसल्याने नवनिर्वाचित अध्यक्ष व सदस्य वेटींगवर होते. जुन्या पदाधिकाऱ्यांची मुदत २५ डिसेंबर रोजी संपत असल्याने सोमवारी नूतन नगराध्यक्ष पदभार स्वीकारतील, असे बुबणे यांनी सांगितले. दरम्यान, नगराध्यक्षांनी पदभार स्वीकारल्यानंतर लगेच कमीत-कमी तीन दिवसात सर्वसाधारण सभा बोलावली जाणार आहे. त्यामध्ये उपनगराध्यक्ष व स्वीकृत सदस्यांच्या निवडी होतील.
नगराध्यक्ष आज पदभार स्वीकारणार
By admin | Updated: December 26, 2016 00:06 IST