शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: हत्येच्या कटावरुन मनोज जरांगेंचा थेट धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, '२.५ कोटींची डील आणि...'
2
अजित पवारांचा घूमजाव, आधी म्हणाले कल्पना होती, आता म्हणतात, "पार्थच्या जमीन व्यवहाराची माहिती नाही"
3
रस्त्यावर भटके कुत्रे दिसले नाही पाहिजे, त्यांना..; सर्वोच्च न्यायालयाचे तीन मोठे आदेश
4
Larissa Nery : "मी राहुल गांधींना ओळखत नाही, भारतात..."; ब्राझिलियन महिलेला वाटली भीती, केला मोठा खुलासा
5
दुकानातून हळूहळू कमी होत होता दारूचा स्टॉक; कपल करत होतं भरलेल्या बाटल्यांची चोरी! कसं पकडलं?
6
२५ लाख ते ६० लाख... गृहकर्जावर महिन्याचा खर्च किती? तुमचा EMI कमी करण्यासाठी 'हा' कालावधी निवडा
7
मारुतीने व्हिक्टोरिस लाँच केली अन् या कारवर बंपर सूट दिली; ऑक्टोबरपेक्षा आणखी ५४,००० रुपयांनी स्वस्त केली...
8
पहिल्याच दिवशी जमिनीवर आला 'हा' आयपीओ; गुंतवणूकदारांना मोठं नुकसान, GMP नं केला 'विश्वासघात'
9
Jasprit Bumrah Record : बुमराहचा मोठा पराक्रम! पाकिस्तानी गोलंदाजाला धोबीपछाड देत बनला 'नंबर वन'
10
Astro Tips: काही जातकांच्या पत्रिकेत विवाह योगच नसतो; त्यांनी कोणता उपाय करावा? पाहू 
11
२०२६ हे पाकिस्तानसाठी 'प्रलयाचे वर्ष'? ज्योतिषांचा धक्कादायक अंदाज; भारतासोबत मोठ्या युद्धाचे संकेत...
12
शनिवारी संकष्ट चतुर्थी, ३ राशींना साडेसाती; ‘हे’ ५ उपाय नक्की करा, शनिदोषातून मुक्तता मिळवा!
13
Video - बॅकबेंचर ते चार्टर्ड अकाउंटंट... लेक CA होताच बापाने मारली घट्ट मिठी, डोळ्यांत आनंदाश्रू
14
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
15
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
16
नितीश कुमारांची डोकेदुखी वाढणार? वाढीव मतदानामुळे सत्तांतराची शक्यता? आकडे काय सांगतात?
17
कार्तिक संकष्ट चतुर्थी २०२५: चंद्रोदयाची वेळ काय? ‘असे’ करा व्रत; राहु काळ, शुभ मुहूर्त पाहा
18
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
19
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! SBI नवीन आयपीओ आणण्याच्या तयारीत, ८ हजार कोटींपर्यंत उभे करण्याचा प्लॅन
20
Jara Hatke: पूजेत, धर्मकार्यात वापरला जाणारा पांढरा शुभ्र कापूर कसा तयार करतात माहितीय?

प्रमुख कारागीर निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 00:17 IST

औरंगाबाद-पुणे मार्गावर ब्रेकशिवाय एसटी धावल्याप्रकरणी प्रमुख कारागिरास निलंबित करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : औरंगाबाद-पुणे मार्गावर ब्रेकशिवाय एसटी धावल्याप्रकरणी प्रमुख कारागिरास निलंबित करण्यात आले आहे. चौकशीमध्ये प्राथमिकदृष्ट्या प्रमुख कारागीर या घटनेला जबाबदार असल्याचे आढळून आले. त्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचे आगार व्यवस्थापक स्वप्नील धनाड यांनी सांगितले.औरंगाबाद-पुणे ही हिरकणी बस २१ आॅक्टोबरला औरंगाबाद मध्यवर्ती बसस्थानाकातून रात्री ११.४५ वाजता पुण्याकडे निघाली. गंभीर गोष्ट अशी की, ही गाडी डेपोमध्ये दुरुस्तीसाठी उभी होती. तिच्या ब्रेकचे काम अर्धवट असतानाच ही गाडी चालकास देण्यात आली. पुढच्या दोन्ही चाकांच्या ब्रेकमध्ये ‘कॅचर’ नावाचा भाग नव्हता. याविषयी २४ आॅक्टोबर रोजी ‘लोकमत’ने सविस्तर वृत्त दिले.नादुरुस्त गाडीच ड्यूटीवर गेल्याचे जेव्हा प्रमुख कारागिराला कळाले तेव्हा एकच गोंधळ उडाला. त्यांनी घाईघाईने चालकाला फोन करून गाडी जेथे असेल तेथे थांबविण्याचे आदेश दिले. तोपर्यंत रात्रीचे १.३० वाजलेले होते आणि गाडी घोडेगावच्या पुढे पोहोचलेली होती. चालकाने गाडी रस्त्याच्या बाजूला उभी केली. काही तासांनंतर आगारातून रिकामी बस पाठविण्यात आली व प्रवाशांना तिच्यामध्ये बसवून पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आले. याप्रकरणी चौकशी केल्यानंतर कर्तव्याकडे दुर्लक्ष केल्याच्या कारणावरून प्रमुख कारागिराला निलंबित करण्यात आले. प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे धनाड यांनी सांगितले. या प्रकरणात आणखी दोघांवर कारवाई होणार आहे. प्रमुख कारागिरांवर झालेली कारवाई चुकीची असल्याचा आरोप संघटनांकडून होत आहे. खालच्या कर्मचा-यांनी योग्य काम केले का नाही, हे पाहण्याची जबाबदारी प्रमुख कारागिराची असते. त्यामुळे कारवाई झाल्याचे अधिका-यांनी सांगितले.