शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

दारू पिण्यास चा‌ळीस रुपये न दिल्याने त्याने पत्नीचा केला खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:04 IST

जायकवाडी : दारू पिण्यासाठी चाळीस रुपये न दिल्याने पतीने त्याच्या पत्नीस गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना पैठण तालुक्यातील ...

जायकवाडी : दारू पिण्यासाठी चाळीस रुपये न दिल्याने पतीने त्याच्या पत्नीस गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना पैठण तालुक्यातील बालानगर येथे उघडकीस आली आहे. २८ जून रोजी ही घटना घडल्यानंतर पत्नीचा आजाराने मृत्यू झाल्याचे नातेवाइकांना सांगून त्याने दुसऱ्या दिवशी अंत्यसंस्कारही करण्यात आले; परंतु मयत महिलेच्या मुलाने हा प्रकार आजीला सांगितल्यानंतर त्यांच्या फिर्यादीवरून जावयावर पैठण एमआयडीसी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला. मीनाबाई ढोक‌ळे (३५) असे खून झालेल्या महिलेचे नाव असून, कैलास ढोक‌ळे (३९) असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बालानगर येथील कैलास दत्तु ढोकळ‌े याने सोमवार, २८ जून रोजी रात्री सात वाजताच्या सुमारास पत्नी मीनाबाईकडे दारू पिण्यासाठी चाळीस रुपयांची मागणी केली. त्यावर तिने पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या कैलासने पत्नीस शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देत तिचा गळा दाबून खून केला. याबाबत घरात असलेल्या दोन्ही मुलांना जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांना गप्प राहण्याचे सांगितले. मुलांनीदेखील भीतीपोटी तोंड उघडले नाही. गावकरी व नातेवाइकांना आजारपणाने पत्नीचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. दुसऱ्या दिवशी मंगळवारी २९ जून रोजी गावकऱ्यांच्या उपस्थितीत मीनाबाई यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

---

आजोळी गेल्यावर मुलांनी फोडला टाहो

खून होऊन सहा दिवस उलटले होते. कोणालाही कानोखबर न लागल्याने कैलास ढोक‌ळे मोकाट फिरत होता. दोन्ही मुलांनाही कैलासने जीवे मारण्याची धमकी दिल्याने ते शांत होते. दरम्यान, शनिवार ३ जुलै रोजी दोन्ही मुले आपल्या आजोळी विहामांडवा येथे गेले. त्यानंतर त्यांनी टाहो‌ फोडत वडिलांनीच आईचा जीव घेतल्याचे आजीला सांगितले. या घटनेने आजोळकडील सर्वांना धक्काच बसला. मयत मीना यांच्या आई इंदूबाई धोंडीराम गुंजाळ (५५, रा. विहामांडवा) यांनी एमआयडीसी पैठण पोलीस ठाणे गाठले. त्यांच्या फिर्यादीवरून मयत मुलीचा पती तथा त्यांचा जावई कैलास दत्तू ढोक‌ळे याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी गोरख भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अर्चना पाटील, राजू जावळे, विजय मोरे करीत आहेत.

--

फोटो :