औरंगाबाद : सुपर पॉवर इन्व्हेस्टमेंट सर्व्हिसेस इंडिया लिमिटेड या कंपनीच्या संचालक दीपक पारखेने गोरगरिबांकडून उकळलेल्या पैशांवर नुसती अय्याशी केल्याचे समोर आले आहे. मुंबई- पुण्यातील लेडीज बारमध्ये जाणे, तेथे बारबालांवर नोटा उधळणे, हा त्याचा नित्याचा कार्यक्रम ठरलेला होता, असे पोलीस सूत्रांनी सांगितले. गुंतवणुकीवर कमीत कमी दिवसांमध्ये जास्तीत जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवून केवळ महाराष्ट्रातील नव्हे, तर परराज्यातीलही हजारो नागरिकांना सुपर पॉवर कंपनीने गंडा घातल्याचे उघड झाले आहे. या कंपनीत चांगला परतावा मिळेल, या आशेने हजारो गोरगरीब नागरिकांनी पैसे गुंतविले होते. अनेक जणांनी तर आपली शेतीवाडी, दागदागिने विकून, घर गहाण ठेवून या कंपनीत पैसे गुंतविले होते. एकीकडे गोरगरीब नागरिक भरघोस परताव्याच्या आशेने अशा पद्धतीने आपले पैसे गुंतवीत असताना दुसरीकडे या हरामाच्या पैशांवर दीपक पारखे हा अय्याशी करीत होता, असे पोलिसांनी सांगितले. कंपनीकडे होणारा गुंतवणूकदारांचा बहुतांश पैसा तो मुंबई- पुण्यातील लेडीजबारमध्ये जाऊन बारबालांवर उडवीत असल्याची माहिती समोर आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. सुपर पॉवरचे ‘सितारे’ अद्याप फरारच1सुपर पॉवरचा संचालक दीपक आणि त्याची पत्नी दिव्या पारखे या दोघांना आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली असली तरी या दाम्पत्याला मदत करणारे सुपर पॉवरचे पाच सितारे म्हणजेच एजंट अद्याप पोलिसांना सापडलेले नाहीत. 2शिवाजी पोळ, सतीश पोळ, शेषराव घुले, प्रधान आडे व हरीश साळवे यांच्यावरही फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेला आहे. आठवडा उलटत आला तरी अद्यापही या आरोपींना पोलिसांनी अटक केली नाही. 3या एजंटांनीच गोरगरिबांकडून पैसे घेऊन ते सुपर पॉवरमध्ये गुंतविले आणि त्या बदल्यात कोट्यवधी रुपयांचे कमिशन कमविले होते.
गोरगरिबांच्या पैशांवर त्याने केली अय्याशी!
By admin | Updated: July 30, 2014 01:18 IST