शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

चारा छावण्यांबाबत अहवाल मागविला

By admin | Updated: February 24, 2016 00:03 IST

हिंगोली : मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये अचानक चारा छावण्या बंद झाल्याने हाहाकार उडाला होता.

हिंगोली : मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये अचानक चारा छावण्या बंद झाल्याने हाहाकार उडाला होता. त्यामुळे शासनाने आता प्रत्येक जिल्ह्यातून वस्तुनिष्ठ अहवाल मागविला आहे. यासाठी २९ फेब्रुवारीला विभागीय आयुक्त बैठक घेणार आहेत.हिंगोली जिल्ह्यात तूर्त चाराटंचाईचा प्रश्न नाही. मात्र यंदा भविष्यात हा प्रश्न समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. ज्वारीचे आगार असणारे तालुकेच यंदा दुष्काळाच्या छायेत होते. शिवाय रबीतील ज्वारीही घेता आली नसल्याचा फटका सोसावा लागणार आहे. शेजारचे जिल्हेही दुष्काळाच्या झळा सोसत आहेत. अशा परिस्थितीत औंढा, वसमत, कळमनुरी या तालुक्यांत नजीकच्याच काळात चाराटंचाईचा फटका बसण्याची भीती आहे. गतवर्षी दुष्काळी स्थिती होती. त्यामुळे आता जुना चाराही गृहीत धरून चालणार नाही. या सर्व पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन व कृषी विभागाचा अहवाल हा पेरणी क्षेत्रावरून अंदाज बांधणारा असतो. प्रत्यक्षात मात्र चित्र वेगळेच असते. त्यामुळे पुन्हा एकदा वस्तूनिष्ठ अहवालाच्या नावाखाली क्षेत्र व चारा उत्पादनाचे सूत्र कागदावर मांडले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. छावण्यांची झंझट टाळण्याचाच प्रयत्न होणार आहे.