शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

मेहनतीने ' श्रीं ' च्या मुर्त्याबनवून कमावलेले  दोन लाख रुपये चोरट्यानी लांबविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2017 18:18 IST

रात्रंदिवस मेहनत करून बनविलेल्या गणेश मूर्ती विक्रीतून मिळालेले मूर्तीकारांचे दोन लाख रुपये चोरट्यांनी लंपास केले. ही घटना शनिवारी पहाटे चार ते सहा दरम्यान औरंगपुरा येथील जिल्हा परिषद मैदानावरील शेडमध्ये घडली.

ठळक मुद्देचमनभाई लालाभाई राठोड हे मूर्तीकार कुटुंब  दरवर्षी गणेशोत्सवात मूर्ती तयार करून विक्री करण्यासाठी औरंगाबादेत येते.मूर्ती विक्रीतून २ लाख १० हजार रुपये त्यांना मिळाले होते.पहाटेच्या साखर झोपेत चोरट्यांनी पाळत ठेवून डाव साधला.

औरंगाबाद, दि. 27 :  रात्रंदिवस मेहनत करून बनविलेल्या गणेश मूर्ती विक्रीतून मिळालेले मूर्तीकारांचे दोन लाख रुपये चोरट्यांनी लंपास केले. ही घटना शनिवारी पहाटे चार ते सहा दरम्यान औरंगपुरा येथील जिल्हा परिषद मैदानावरील शेडमध्ये घडली. याप्रकरणी क्रांतीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. 

याविषयी अधिक माहिती देताना क्रांतीचौक पोलिसांनी सांगितले की, अहमदाबाद(गुजरात) येथील रहिवासी चमनभाई लालाभाई राठोड हे मूर्तीकार कुटुंब  दरवर्षी गणेशोत्सवात मूर्ती तयार करून विक्री करण्यासाठी औरंगाबादेत येते. यावर्षीही दोन महिने आधी ते शहरात आले होते. औरंगपुरा येथील जि.प. मैदानावर बांबूच्या शेड तयार करून ते राहत आणि तेथेच त्यांनी गणेश मूर्ती तयार केल्या होत्या. या मूर्तींची विक्री त्यांनी आणि त्यांच्या कुटुबातील सदस्यांनी शुक्रवारी सकाळी ८ ते रात्री ११पर्यंत केली. यानंतर सर्वांनी जेवण केल्यानंतर प्रत्येकांकडील पैसे एकत्र करून त्याची मोजणी केली. रात्री ३ वाजेपर्यंत मोजणीअंती मूर्ती विक्रीतून २ लाख १० हजार रुपये त्यांना मिळाले होते. ही रक्कम त्यांनी पत्नी पूनमबेन राठोड हिच्याकडे दिले आणि तिच्या उशीच्या खोळमध्ये ठेवले. सुमारे ४ वाजेच्या सुमारास राठोड पती-पत्नी झोपली. 

सकाळी ६ वाजेच्या सुमारास पुनमबेन झोपेतून उठली तेव्हा त्यांना उशाखाली ठेवलेली पैशाची खोळ (पिशवी)कापून कोणीतरी त्यातील दोन लाख रुपये लांबविल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.या खोळमध्ये केवळ दहा हजार रुपये शिल्लक ठेवून चोरटा पसार झाला होता. रात्रंदिवस मेहनत करून जमविलेले रोख दोन दोन लाख रुपये चोरट्यांनी पळविल्याचे त्यांनी पतीला सांगितले. या घटनेने राठोड कुटुंब पूर्ण हादरून गेले. त्यांनी या घटनेची माहिती क्रांतीचौक पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. अनोळखी चोरट्यांविरूद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलीस निरीक्षक अनिल आढे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संजय बनकर हे तपास करीत आहे.

उधारी कशी फेडावी  मूर्ती तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल राठोड दाम्पत्य  व्यापा-यांकडून उधारीवर खरेदी करतात आणि गणशोत्सवानंतर त्यांना पैसे देतात. आता चोरट्यांनी संपूर्ण रक्कमच पळविल्याने व्यापा-यांची उधारी कशी  फेडावी,असा प्रश्न आता त्यांच्यासमोर पडला आहे.

पाळत ठेऊन केली चोरीराठोड दाम्पत्य हे रात्री ३ पर्यंत जागे होते.पहाटे ४ ते ६ दरम्या मूर्तीकार राठोड दाम्पत्य झोपले. पहाटेच्या साखर झोपेत चोरट्यांनी पाळत ठेवून डाव साधला.