शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रावण सोमवारी दु:खाचा डोंगर; पाथरीत कावड यात्रेत कार घुसली, दोन भाविकांचा जागीच मृत्यू
2
इस्रायलने पत्रकारांच्या छावणीवर हल्ला केला; अल-जझीराचे पाच पत्रकार ठार, आयडीएफ म्हणतेय...
3
कोण म्हणतोय प्रेमात धोका... भारतीय सुधारले; २ वर्षांत १६% कमी झाले, नात्यात हे निवडू लागले...
4
सरकार बँक ऑफ महाराष्ट्र-LIC सह 'या' ५ बँकांमधील हिस्सा विकणार, गुंतवणूकदारांना काय फायदा?
5
Donald Trump Tariff on India: डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर सरकारचा प्लान तयार, आता देणार ‘जशास तसं’ उत्तर
6
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय कधी आहे? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, मान्यता
7
रुग्णवाहिकेचा भीषण अपघात; पतीचा मृतदेह घेऊन जाणाऱ्या पत्नीचा दुर्दैवी अंत
8
भावाचा जीव वाचवण्यासाठी गेलेल्या बहिणीलाच मृत्यूने कवटाळलं; रक्षाबंधनच्या दिवशीच कुटुंबावर शोककळा
9
भयंकर! भाजपा नेत्याने पत्नीच्या हत्येचा कट रचला, काटा काढला, नंतर स्वत:वरच केला हल्ला, अखेर...
10
श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: धन-धान्य-ऐश्वर्य लाभेल, ‘हे’ उपाय अवश्य करा; गणपती शुभच करेल!
11
निम्म्यापेक्षाही अधिक घसरण, ५ दिवसांत ४०% नं घसरला हा मल्टिबॅगर शेअर; तुमच्याकडे आहे का?
12
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
13
फक्त १०,००० रुपये गुंतवून जमा होईल ३ कोटी रुपयांचा फंड! १०:१२:३० चा फॉर्म्युला असा करतो काम
14
कीबोर्डच्या F आणि J बटणांवर लहान रेषा का असतात? ९९ टक्के लोक अज्ञात असतील...
15
Festival: तिथीवरून वर्षभराचे सण आणि महिने कसे लक्षात ठेवायचे ते शिका आणि मुलांनाही शिकवा!
16
पगारवाढीचा 'T' फॅक्टर! TOR म्हणजे काय? ज्याशिवाय ८ वा वेतन आयोग लागू होणार नाही, लगेच जाणून घ्या!
17
असित मोदींनी 'दयाबेन'सोबत साजरा केला रक्षाबंधनाचा सण, दिशा वकानीबद्दल म्हणाले...
18
'निमिषा प्रियाला अजिबात माफ केले जाणार नाही, तिला ताबडतोब फाशी द्या', तलालच्या भावाने तिसऱ्यांदा दाखल केली याचिका
19
Tarot Card: ध्येयपूर्तीकडे वाटचाल करायला लावणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
20
१२ वर्षं वय... ३ महिन्यांत 200 जणांनी केलं 'वाईट कृत्य'! तुम्हालाही हादरवून टाकेल मुंबईतून रेस्क्यू करण्यात आलेल्या चिमुकलीची कहाणी

‘हर हर महादेव’...चा जयघोष !

By admin | Updated: February 18, 2015 00:43 IST

बीड : जिल्ह्यात महाशिवरात्री निमित्त मंगळवारी विविध कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले. शिवालयांमध्ये पहाटेपासूनच भाविकांनी रांगा लावल्या़ ‘हर हर महादेव़़़

बीड : जिल्ह्यात महाशिवरात्री निमित्त मंगळवारी विविध कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले. शिवालयांमध्ये पहाटेपासूनच भाविकांनी रांगा लावल्या़ ‘हर हर महादेव़़़ जय जय शिवशंकऱ़!’ या जयघोषांनी मंदिर परिसर दुमदुमून गेले होते. बारा ज्योतिर्लिंगापैकी प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी परळीत लाखो भाविकांची गर्दी झाली होती़महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आर.आर. पाटील यांच्या निधनामुळे परळी येथे अत्यंत साध्या पद्धतीत कार्यक्रम पार पडले. परळी येथे वैद्यनाथ मंदिर परिसरात पहाटे दोन वाजल्यापासूनच लाखो भाविकांनी रांगेत उभे राहून दर्शन घेतले़ सकाळी प्रभू वैनाथाची दुग्धाभिषेकाने पूजा करण्यात आली़ रात्री नऊ पर्यंत जवळपास पाच लाख भाविकांनी दर्शन घेतले, अशी माहिती विश्वस्थांनी दिली़ परराज्यातील भाविकांनीही येथे दर्शनासाठी हजेरी लावली़ भाविकांना सुरळीत दर्शन घेता यावे ठिकठिकाणी लोखंडी बॅरीकेटस् लावले होते़ शिवाय भाविकांना पाण्याची सोय करण्यात आली़ कोणताही अनुचित प्रकार घडु नये यासाठी तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता़ अत्यंत लहानसहान हालचालींवर पोलिसांचे बारीक लक्ष होते़ वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिवसभर बंदोबस्ताची धुरा सांभाळली़ वैद्यनाथ मंदिराच्या रस्त्यावर पालिकेने पाणी, फराळाची व्यवस्था केली होती़ सामाजिक संस्थांनीही भाविकांच्या सोयीसुविधेसाठी प्रयत्न केले़ हरिश्चंद्र पिंप्रीत मांदीयाळीवडवणी तालुक्यातील राजा हरिश्चंद्राच्या पुरातन मंदिरात भाविकांची मांदीयाळी पहावयास मिळाली. पहाटे पाच वाजल्यापासून येथे दर्शनासाठी रिघ लागली होती. सकाळी महापूजा व आरती करण्यात आली. भाविकांना सुरळीत दर्शन घेता यावे यासाठी महिला व पुरूषांची स्वतंत्र रांग केली होती. महाशिवरात्रीचे औचित्य साधून येथे खेळणी, फराळाची दुकाने लागली होती. परिसरातील हजारो भाविकांनी दर्शन घेतले. भाविकांसाठी मंदीर परिसरातच फराळाची व्यवस्था भगवान महाराज राजपुत यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थांनी केली. पशुवैद्यकीय विभागानेही जनावरांची मोफत तपासणी करून गुरांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात होता. सौताडा दुमदुमलेपाटोदा तालुक्यातील सौताडा येथील श्री क्षेत्र रामेश्वर मंदिरामध्ये परिसरातील भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. पहाटेपासूनच येथे दर्शनासाठी भाविकांनी हजेरी लावली. दर्शन सुरळीत व्हावे या करीता पोलिसांनी परिश्रम घेतले. सिद्धेश्वर मंदिरात धार्मिक कार्यक्रमशिरूरकासार तालुक्यातील सिद्धेश्वर मंदिरामध्ये शिवरात्र महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी भजन, कीर्तन आदी कार्यक्रम पार पडले. तापोवन व गोवर्धन येथेही दर्शनासाठी गर्दीपरळी तालुक्यातील सिरसाळ्यापासून जवळच असलेल्या परळी- बीड मुख्य मार्गावर तपोवन तर सिरसाळा-माजलगाव जाणाऱ्या रस्त्यालगत गोवर्धनचा अर्जुनेश्वर हे दोन पुरातन शिवमंदिरे आहेत. श्रावण महिना असो की शिवरात्र या ठिकाणी दर्शनासाठी भाविक दूरदूरहून येतात. मंगळवारी हजारो भाविक दर्शनासाठी दाखल झाले होते. तपोवनचा तपेश्वर वीस फुट खोल असल्यामुळे पायऱ्या- पायऱ्या उतरून दर्शन घ्यावे लागते. सकाळपासूनच ग्रामस्थांनी त्या ठिकाणी अभिषेक केला. गोवर्धनाच्या अर्जुनेश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त शिवलिलामृताचे पारायण करण्यात आले. गावातील महिला, पुरुषांनी पारायण केले. त्यानंतर सर्व भाविकांना फराळाचे वाटप करण्यात आले. त्या ठिकाणी महिलांच्या लांब रांगा दिसून आल्या. मंदिराबाहेर वेगवेगळ्या खेळण्यांची दुकाने थाटण्यात आली होती. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या अधिक असल्याने खाजगी गाड्या- बसगाड्या गर्दीने भरलेल्या होत्या.बीड येथील कंकालेश्वर मंदिरात दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने आले होते. पहाटेपासूनच येथे शहराच्या कानाकोपऱ्यातून भाविकांनी हजेरी लावली. या ठिकाणी सकाळी महादेवाच्या मूर्तीची पूजा करण्यात आली. दर्शन सुरळीत व्हावे यासाठी पोलिसांचा बंदोबस्त तैनात होता. मंदिर परिसरामध्ये भाविकांसाठी साबुदाना खिचडीची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी कल्याण महाराज, भास्कर महाराज, प्रभाकर महाराज आदी उपस्थित होते. या शिवाय जटाशंकर मंदिर, पापनेश्वर मंदिर, बार्शीरोडवरील सोमेश्वर मंदिर, मार्कंडेय मंदिर येथेही भाविकांची तोबा गर्दी दिसून आली.परळी येथील वैद्यनाथ मंदिरात जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी महापूजा केली.४विरोधी पक्ष नेते आ. धनंजय मुंडे, खा. डॉ. प्रीतम मुंडे, महाराष्ट्र मीरासंत अलकाश्रीजी यांनी वैद्यनाथाच्या दर्शनासाठी हजेरी लावली.४यात्रोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी स्वत: हजर होते. तसेच उपविभागीय अधिकारी सविता चौधर यांनी तीन बैठका घेऊन नियोजन लावले.