शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
5
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
6
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
7
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
8
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
9
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
10
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
11
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
12
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
13
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
14
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
15
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
16
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
17
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
18
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
19
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला

राजेंद्र दर्डा यांच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 00:51 IST

‘लोकमत वृत्तपत्र समूहा’चे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांच्यावर विविध क्षेत्रांतील मान्यवर, चाहते व वाचकांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव केला. ‘लोकमत’च्या प्रांगणात मंगळवारी यानिमित्त जनसागर लोटलेला होता.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : ‘लोकमत वृत्तपत्र समूहा’चे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांच्यावर विविध क्षेत्रांतील मान्यवर, चाहते व वाचकांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव केला. ‘लोकमत’च्या प्रांगणात मंगळवारी यानिमित्त जनसागर लोटलेला होता.राजकीय, सामाजिक, आर्थिक, उद्योग, कला, क्रीडा, शिक्षण, साहित्य, बांधकाम व्यापार या क्षेत्रांतील मंडळींनी राजेंद्र दर्डा यांना शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती. विविध संस्था-संघटनांचे पदाधिकारी, प्रतिनिधी तसेच जुन्या जाणत्यांबरोबरच तरुण आणि महिलांच्या उपस्थितीने एक रंगबिरंगी आनंदनगरीच निर्माण झालेली बघावयास मिळाली. राजेंद्र दर्डा यांच्याप्रती असलेली सद्भावना, लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी केलेल्या कामांची आठवण ही पदोपदी ताजी होत होती.सकाळपासूनच जालना रोडवरील ‘लोकमत’चे प्रांगण माणसांनी आणि शुभेच्छांसाठी आणलेल्या फुलांनी बहरून गेले होते. राजेंद्र दर्डा यांनी सुहास्य वदनाने सर्वांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला. अनेकांंनी शुभेच्छा देताना उत्स्फूर्तपणे शेरोशायरी पेश केली. काहींनी कवितेच्या ओळी सादर केल्या, तर काही जणांचा याचदिवशी वाढदिवस असल्याचे लक्षात येताच त्यांचाही राजेंद्र दर्डा यांनी शुभेच्छा देऊन सन्मान केला.पक्ष, जात-धर्मविरहित जनसमुदायाचा हा जणू स्नेहमेळावाच ठरला. यानिमित्ताने एकमेकांच्या भेटी झाल्या. हास्यविनोदात त्यांचा संवाद रंगला. स्वत: राजेंद्र दर्डा हे सर्वांशी अत्यंत आपुलकीने संवाद साधत होते. यानिमित्ताने एक वेगळेच चैतन्य निर्माण झाले होते. सायंकाळी ७ वाजेनंतरही उशिरापर्यंत शुभेच्छांचा वर्षाव चालूच राहिला. मनामनात शुभेच्छा घेऊन लोंढेच्या लोंढे ‘लोकमत’च्या दिशेने धावत होते.एका विवाह समारंभाच्या निमित्ताने शहरात अनेक राजकीय दिग्गज दाखल झाले होते. त्यांनी वाढदिवसानिमित्त राजेंद्र दर्डा यांना आठवणीने शुभेच्छा दिल्या. शुभेच्छा देण्यासाठी सकाळपासूनच त्यांचा मोबाइल खणखणत राहिला. सोशल मीडियावरही शुभेच्छांची धूम राहिली. व्हॉटस् अ‍ॅप, फेसबुकवर क्षणातराजेंद्र दर्डा यांना शुभेच्छा दिलेली छायाचित्रे झळकत होती. त्याचाही एक आगळा आनंद सोशलमीडियावर सक्रिय असलेल्यांनी लुटला.हडकोमध्ये रक्तदान शिबीरराजेंद्र दर्डा यांच्या वाढदिवसानिमित्त टी.व्ही. सेंटर परिसरातील पोलीस-सैनिकी भरतीपूर्व प्रशिक्षण संस्थेत रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. त्याप्रसंगीच्या छायाचित्रात स्वत: राजेंद्र दडां, संयोजक प्रा. राजेश भोसले पाटील आदी.लाडूतुलाराजेंद्र दर्डा यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवारी दुपारी गोमटेश मार्केटमध्ये राजेंद्र दर्डा यांची लाडूतुला करण्यात आली. वेलकम ट्रॅव्हल्सचे सुभाष बाहेती आणि परिवारातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. राजेंद्र दर्डा यांचे श्रीमती रंभाबाई बाहेती यांनी पुष्पहार देऊन स्वागत केले. त्यानंतर लाडूतुला करण्यात आली. यावेळी गुलमंडी, गोमटेश मार्केट, टिळक रोड परिसरातील व्यापारी व राजकीय क्षेत्रातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.आंबेडकरनगरात रंगला सांस्कृतिक कार्यक्रम ‘लोकमत’चे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांच्या वाढदिवसानिमित्त डॉ. आंबेडकरनगरात हजारो रसिकांच्या उपस्थितीत सांस्कृतिक कार्यक्रम रंगला. यात सिद्धार्थ दामोदर यांच्या नृत्याने डोळ्यांचे पारणे फेडले, तर हास्य कलावंत प्रकाश भागवत यांनी उपस्थितांना विविध किस्से सांगून हसविले.या कार्यक्रमाला जोडूनच दिवसा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ झालेल्या मोफत नेत्रतपासणी शिबिरात डॉ. नागदेव व त्यांच्या सहकाºयांनी २५० रुग्णांची तपासणी केली. मोतीबिंदू असलेल्या रुग्णांची मोफत शस्त्रक्रिया करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. याच ठिकाणी महिलांची रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते चक्रधर मगरे व शशिकला मगरे यांच्या पुढाकारातून या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.