शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

पावसाच्या गीतांनी सखी चिंब

By admin | Updated: July 27, 2016 00:46 IST

औरंगाबाद : बाहेर पाऊसधारा आणि सिडको नाट्यगृहात ओसंडून वाहणारा उत्साह....प्रत्येक पावसाच्या गाण्यावर एकच जल्लोष....युवती, महिला सारेच चिंब-चिंब..

औरंगाबाद : बाहेर पाऊसधारा आणि सिडको नाट्यगृहात ओसंडून वाहणारा उत्साह....प्रत्येक पावसाच्या गाण्यावर एकच जल्लोष....युवती, महिला सारेच चिंब-चिंब...२५ जुलै सोमवारचा अविस्मरणीय दिवस आणि रंगलेला गाण्याचा कार्यक्रम....निमित्त होते कलर्स प्रस्तुत सखी मंचच्या वतीने आयोजित ‘रिमझिम गाणी झलक सुहानी’ कार्यक्रमाचे.हा कार्यक्रम सखींच्या भरगच्च गर्दीत बहरला. प्रसिध्द गायकांच्या आवाजातील गाणी येथील उत्कृष्ट गायक कलावंतांनी सादर केली. प्रत्येक गाण्याला सखींची दिलखुलास दाद हे वैशिष्ट्य ठरले. कार्यक्रमाचे उद्घाटन अनघा काळे, रोहित महाजन आणि स्मिता सोनटक्के यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. सूत्रसंचालन दिलीप खिस्ती यांनी केले.प्रारंभ गौरव पवार यांच्या ‘सूर निरागस हो’ या गीताने झाला. त्यानंतर एकापेक्षा एक सुरेख गीते सादर करण्यात आली. प्रसिध्द गायक रवींद्र खोमणे यांनी ‘काळी माती निळ पाणी हिरवे शिवार’ व अनघा काळे यांनी ‘अजीर मन झाले’ हे गीत सादर करून कार्यक्रमाला एका उंचीवर नेऊन ठेवले. गौरव पवार यांनी ‘माऊली माऊली’ हे गीत सादर करून प्रेक्षकांची वाहवा घेतली. ‘झिंगाट’ या गाण्यावर सखींनी ताल धरला. अनघा काळे व गौरव पवार यांनी ‘सैराट झालं जी, याड लागलं, हिरवा निसर्ग हा मस्तीने’ ही बहारदार गीते सादर केली. गीतांना साथसंगत की-बोर्डवर राजू जगधणे, आॅक्टो-कार्डवर अमित निर्मळ, ढोलक-ढोलकीवर राजेंद्र वैराळ यांनी दिली. रोहित महाजन व स्मिता सोनटक्के यांचे नृत्य स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून विशेष सहकार्य लाभले. एकूणच या कार्यक्रमाने संगीतासोबत पावसाचा एक वेगळा रंग अनुभवता आला.पुन्हा एकदा कलर्स चॅनलवर ३० जुलै २०१६ पासून शनिवारी रात्री १० वाजता झलक दिखला जा हॉट है सुरू होणार आहे. यावेळचे मुख्य आकर्षण म्हणजे २००६ ची मिस युनिव्हर्स श्रीलंका आणि सुप्रसिध्द मॉडेल- नायिका जॅकलीन फर्नांडिस सेलिब्रेटी जज आहे. याशिवाय सुप्रसिध्द फिल्म दिग्दर्शक करण जोहर, सुप्रसिध्द कोरिओग्राफर गणेश हेगडे हे सुध्दा परीक्षकांच्या भूमिकेत धमाल करणार आहेत.एकूण १२ सेलीब्रेटी या झलक दिखला जा हॉट है यामध्ये सहभागी होणार आहेत. ज्यात सुरवीन चावला, करिश्मा तन्ना, शक्ती अरोरा, अर्जुन बिजलानी, गौरव गेरा (चुटकी फेम), पूनम शहा, प्रियंका शहा (जुळ्या बहिणी), हरपाल सिंग सोखी (शेफ), हेली शाह, नोरा फतेही, सलमान युसूफ खान, सिध्दांत गुप्ता आणि शांतनू माहेश्वरी असे १० नामवंत प्रख्यात सेलीब्रेटी या शो चे आकर्षण आहे. पण जॅकलीन फर्नांडिसच्या सहभागाने या शो ला एक ग्लॅमरस आणि सिझलिंग स्वरूप आले आहे. जे या शोचे वैशिष्ट्य आहे.