शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

निलंग्यात ५ लाखांच्या दागिन्यांवर हात साफ

By admin | Updated: May 20, 2014 01:32 IST

निलंगा : शहरातील एका सराफा दुकानात सोने खरेदीच्या बहाण्याने आलेल्या चोरट्याने तब्बल ४ लाख ६६ हजार रुपयांच्या दागिन्यांवर डल्ला मारला.

निलंगा : शहरातील एका सराफा दुकानात सोने खरेदीच्या बहाण्याने आलेल्या चोरट्याने तब्बल ४ लाख ६६ हजार रुपयांच्या दागिन्यांवर डल्ला मारला. ही घटना सोमवारी भरदिवसा घडली आहे. या प्रकरणी निलंगा पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला. निलंग्यातील रामजानकी ज्वेलर्स या दुकानात अंगठी खरेदी करण्याच्या निमित्ताने एक अज्ञात व्यक्ती गेली होती. अर्ध्या ग्रॅमच्या अंगठीबाबत या चोरट्याने विचारणा केली. त्यानुसार सराफाने अंगठी दाखविली. ती ठेवून घेत चोरट्याने १ हजार ४०० रुपये रोख दुकानदारास दिले. या रकमेची पावती बनवीत असताना दुकान मालकाची नजर चुकवून या चोरट्याने काऊंटरवरील ट्रेमधून सोन्याच्या अंगठ्या ठेवलेली डबी व दागिन्यांचे पाकीट खिशात घातले. पावती थोड्या वेळाने नेतो असे सांगून हा चोरटा तातडीने दुकानाबाहेर पडला. काही वेळाने दुकान मालकांच्या लक्षात ही बाब आल्यानंतर त्यांनी सीसीटीव्ही कॅमेर्‍यात तपासणी केली. त्यातून अर्धा ग्रॅम अंगठी खरेदीसाठी आलेल्या व्यक्तीनेच दागिने चोरल्याचे समोर आले. या घटनेत अंगठी, नाल, मणीगोळी, मंगळसूत्र, झुमके, गंठण, नेकलेस, मोड असा जवळपास ४ लाख ६६ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला आहे. या प्रकरणी दुकान मालक रामचंद्र गुंडेराव नाईक यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार निलंगा पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. (वार्ताहर)