शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
2
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
3
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
4
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
5
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
6
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
7
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
8
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
9
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
10
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
11
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
12
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
13
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
14
Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
15
Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी
16
PNB घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी अटकेत, अमेरिकेत मुसक्या आवळल्या
17
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...
18
धक्कादायक! दुधात थुंकायचा आणि तेच लोकांना द्यायचा; किळसवाणा प्रकार CCTV मध्ये कैद
19
इंग्लंडनं २४ चेंडूत गमावल्या ९ विकेट्स! टीम इंडियानं अखेरच्या षटकात हातात आलेली मॅच घालवली
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, केवळ व्याजातूनच होईल ₹८२,००० ची कमाई; एकरकमी गुंतवणूक करावी लागणार

साताऱ्यात दुसऱ्या दिवशीही हातोडा

By admin | Updated: December 4, 2014 00:56 IST

औरंगाबाद : सातारा- देवळाई नगर परिषदेच्या अतिक्रमण हटाव पथकाने दुसऱ्या दिवशी पार्किंग सोडून पाचव्या मजल्याच्या तयारीतील दोन बांधकामांवर हातोडा टाकला

औरंगाबाद : सातारा- देवळाई नगर परिषदेच्या अतिक्रमण हटाव पथकाने दुसऱ्या दिवशी पार्किंग सोडून पाचव्या मजल्याच्या तयारीतील दोन बांधकामांवर हातोडा टाकला. मनपाचे प्रशिक्षित अतिक्रमण हटाव पथक सातारा- देवळाई नगर परिषदेच्या मदतीला धावून गेले. साताऱ्यात ‘सिंघम’ प्रशासक विजय राऊत, मुख्याधिकारी अशोक कायंदे यांच्या टीमचा जोर वाढल्याने सलग दुसऱ्या दिवशीच्या कारवाईने बिल्डर व नागरिकांत घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. आज मनपाचे अतिक्रमण हटाव प्रमुख शिवाजी झनझन कारवाईत सहभागी झाले.नगर परिषदेने ३१४ बांधकामधारकांना नोटिसा बजावल्या असून, एक महिन्याच्या कालावधीनंतरही त्याविषयी बांधकामधारकांनी पावले उचलली नाहीत. कारण ग्रामपंचायतीनेही बांधकामधारकांना विनापरवाना बांधकामासाठी नोटीस देऊन सूचना केल्या होत्या; परंतु त्या नोटिसांना संबंधितांनी जुमानले नाही. एक महिन्यानंतरही काय होणार म्हणून अक्षम्य दुर्लक्ष करीत बांधकामावर स्लॅब वाढत गेले. गट नं. ८० येथे संतोष बुरकूल यांनी कॉम्प्लेक्सचे काम सुरू केले. त्यांना नगर परिषदेने नोटीस देऊन महिन्याचा कालावधी उलटला असला तरी बांधकामाचा सपाटा सुरूच होता, तर शेख सलीम, शेख अयूब व नसीम खान या तिघांच्या गट नं. ९३ रणजितनगरमध्ये इमारती आहेत. बुरकूल व या तिघांच्या इमारतींचे दोन मजले पाडण्यात आले. नवीन बांधकाम सुरू असलेली १० कामे पहिल्या टप्प्यात टार्गेट केली असली तरी कोणते बांधकाम पाडणार याविषयी गुप्तता पाळली आहे. एफएसआयचा नियम सातारा परिसरात बहुतांश नागरिकांनी पाळला आहे; पण अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांनी नियमांचे उल्लंघन केले आहे.ग्रामपंचायतीकडून परवानगीग्रामपंचायतीकडून बांधकाम परवानगी घेतली हे मान्य; परंतु सिडकोच्या ना हरकत प्रमाणपत्राशिवाय बांधकामांना मंजुरीच देता येत नाही, असा नियम आहे. ग्रामपंचायतीच्या ना हरकतीच्या आधारे रजिस्ट्री करण्यात आलेली आहे. त्याच रजिस्ट्रीच्या आधारे घरांवर मजले चढवून ते सरळ विक्री केले जात आहेत. खाजगी बँकांचे कर्ज प्रकरण करून बिल्डरांनी आपली पोळी भाजून घेतली. आता सामान्य नागरिकांनी रंगविलेली घराची स्वप्ने पत्त्याच्या बंगल्यासारखी ढासळून जात आहेत. बिल्डरला सुरुवातीची रक्कम भरून नागरिकांनी घर ताब्यात घेण्याचे प्रयत्न केले आहेत. घराचे बांधकाम एक चटई क्षेत्र (एफएसआय) आणि बांधकाम दुप्पट- तिप्पट असल्याचे ‘सिंघम’ विजय राऊत यांच्या निदर्शनास आले.