शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मनपाचा अतिक्रमणावर हातोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 01:02 IST

नांदेड : जुन्या नांदेडातील किल्ला ते दरबार मशिद या रस्त्याच्या रूंदीकरणासाठी महापालिकेने गुरूवारी अतिक्रमण हटाव मोहिम हाती घेतली़ या रस्त्यावरील ८ मालमत्तापैकी ५ मालमत्ता पाडण्यात आल्या़ यावेळी स्थानिक नागरिकांनी विरोध दर्शविला़ मात्र पोलीस बंदोबस्त मोठा असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही़

ठळक मुद्देमोठा पोलीस बंदोबस्त : ४ मालमत्ता जेसीबीने जमिनदोस्त; रस्तारुंदीकरणाचा मार्ग मोकळा

नांदेड : जुन्या नांदेडातील किल्ला ते दरबार मशिद या रस्त्याच्या रूंदीकरणासाठी महापालिकेने गुरूवारी अतिक्रमण हटाव मोहिम हाती घेतली़ या रस्त्यावरील ८ मालमत्तापैकी ५ मालमत्ता पाडण्यात आल्या़ यावेळी स्थानिक नागरिकांनी विरोध दर्शविला़ मात्र पोलीस बंदोबस्त मोठा असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही़जेएनएनयुआरएम अंतर्गत किल्ला ते दरबार मशिद हा रस्ता क्रमांक ८ च्या रूंदीकरणासाठी अतिक्रमणाची अडचण निर्माण झाली होती़ दरम्यान, महापालिकेने या जागेपोटी १ कोटी ६६ लाख रूपये मावेजा उपजिल्हाधिकारी, भूसंपादन विभागाकडे जमा केला होता़ त्यानंतर संबंधित विभागाकडून या जागेचा ताबा ३० आॅक्टोबर रोजी महापालिकेला देण्यात आला होता़ त्यामुळे या रस्त्यावरील अतिक्रमण पाडण्याचा मार्ग मोकळा झाला होता़ या रस्त्याची मंजुरी २०१३ मध्ये मिळाली होती़ त्यावेळी या रस्त्यावर ३५ मालमत्ता होत्या़ त्यातील २७ मालमत्ताधारकांनी निकषानुसार मावेजा घेवून मार्ग मोकळा केला होता़ मात्र ८ मालमत्ताधारकांनी जुन्या रेट नुसार मावेजा घेण्यास विरोध दर्शवून त्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली़ परंतु न्यायालयात महापालिकेच्या बाजुने निकाल लागला़ या अतिक्रमणधारकांमध्ये रफत हुसैन अन्सारी, शेख सालम शेख बावजीर, अमिरबीन अजान, शेख मुनीर शेख मदार, अमीजोद्दीन मोईनोद्दीन, महमंद बासीद अब्दुल हफीज, सयद खलील उल्ला हुसेनी, शेख मुनीर शेख मदार बागवान यांचा समावेश आहे़महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून १६ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजता या रस्त्यावरील अतिक्रमण पाडण्यास सुरूवात केली़ मालमत्ता पाडण्याचे काम सुरू असताना काही नागरिकांनी विरोध दर्शविला़ मात्र पोलिस बंदोबस्त मोठा असल्याने स्थानिक नागरिकांचा विरोध मावळला़त्यामुळे गुरूवारी सायंकाळपर्यंत ४ मालमत्ता पाडण्यात आल्या़ उर्वरित मालमत्ता पाडण्याचे काम शुक्रवारी करण्यात येणार आहे़ अतिक्रमण हटाव कार्यवाही वेळी सहायक आयुक्त प्रकाश येवले,सहायक आयुक्त गुलाम सादेक, कार्यकारी अभियंता प्रकाश कांबळे, क्षेत्रीय अधिकारी मिर्झा बेग, संजय कांबळे, स्टेडियम व्यवस्थापक रमेश चौरे, क्षेत्रीय अधिकारी संजय जाधव, जमील अहेमद, अविनाश अटकोरे, रईस पाशा आदी उपस्थित होते़ तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी अभिजित फस्के, तहसीलदार किरण अंबेकर, नायब तहसीलदार विजयकुमार पाते, मंडळ अधिकारी जोंधळे, पोलिस निरिक्षक अनिल गायकवाड यांच्यासह ८४ पोलिस कर्मचारी घटनास्थळ हजर होते़ अतिक्रमण पाडण्यासाठी २ जेसीबी, १ पोकलेन, २ टिप्पर, ६ ट्रक्टर व ८० मजूर कामावर होते़ सायंकाळी ६ नंतरही मनपाच्या पथकाकडून अतिक्रमण पाडण्याचे काम सुरुच होते़ उशिरापर्यंत पोलिस बंदोबस्तही तैनात होता़