: महावितरण कंपनीच्या विरोधात शुक्रवारी कार्यालयासमोर भाजपाने कुलूप ठोकून हल्लाबोल आंदोलन केले. महाराष्ट्रात ७५ लाख ग्राहकांना वीज कनेक्शन तोडण्याची नोटीस पाठवून जनतेला अंधारात टाकण्याचे काम केले आहे. त्यामुळे हे तात्काळ थांबवावे, वीज दरात केलेली वाढ रद्द करावी, जळालेली रोहित्र तात्काळ बसविण्यात यावे, शेतीपंपासाठी आवश्यक तो वीजपुरवठा करावा आदी मागण्यासाठी आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात जि.प.चे उपाध्यक्ष एल.जी. गायकवाड, सभापती गणेश अधाने, उपनगराध्यक्ष सुरेश मरकड, तालुकाध्यक्ष प्रकाश वाकळे, शहराध्यक्ष सतीश दांडेकर, दिनेश अंभोरे, परसराम बारगळ, योगेश बारगळ, युवराज ठेंगडे, ज्ञानेश्वर नलावडे, अविनाश कुलकर्णी, आशिष कुलकर्णी, नारायण राठोड, गोविंद काळे, राहुल निकुंभ, दिनेश भारती, निलेश हरणे, बाळू नलावडे, आनंदा काटकर, विकास कापसे, विकास सुसलादे, किशोर भावसार, प्रवीण बारगळ, सुनिता दिवेकर, कावेरी जाधव आदी उपस्थित होते. यावेळी नायब तहसीलदार पी.बी. गवळी यांनी निवेदन स्वीकारले.
- कँप्शन : खुलताबादेतील महावितरण कार्यालयास कुलूप ठोकून हल्लाबोल आंदोलन करतांना भाजपचे पदाधिकारी.