शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
4
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
5
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
6
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
7
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
8
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
9
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
10
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
11
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
12
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
13
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
14
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
15
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
16
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
17
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
18
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
19
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
20
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
Daily Top 2Weekly Top 5

देशातील निम्मे मातामृत्यू महाराष्ट्रात

By admin | Updated: July 10, 2014 01:15 IST

माधवी वाकोडकर, औरंगाबाद देशातील माता मृत्यूंमध्ये प्रगतिशील म्हणवून घेणाऱ्या महाराष्ट्राचे नाव आघाडीवर आहे.

माधवी वाकोडकर, औरंगाबाददेशातील माता मृत्यूंमध्ये प्रगतिशील म्हणवून घेणाऱ्या महाराष्ट्राचे नाव आघाडीवर आहे. आज देशात लाखामागे माता मृत्यूचे प्रमाण १७८ असून यातील निम्मे मृत्यू (सरासरी ८७) एकट्या महाराष्ट्रात होतात. केंद्र सरकार गेल्या अनेक वर्षांपासून देशात राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान राबवीत आहे. या माध्यमातून मातांच्या आरोग्याकडे लक्ष दिले जात आहे. माता, अर्भक व नवजात शिशूंचा मृत्यू रोखणे हे या मोहिमेचे लक्ष्य आहे. एसआरएस (सॅम्पल रजिस्ट्रेशन स्कीम- नमुना नोंदणी पद्धती) या केंद्र सरकारच्या सर्वेक्षण टीमच्या पाहणी अहवालानुसार आरोग्य यंत्रणा व व्यवस्थापनामध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. या टीमद्वारे मातामृत्यू दरासंदर्भातील पाहणी दर तीन वर्षांनी केली जाते. ही पाहणी जिल्ह्यांतर्गत केली जाते. मात्र, अहवाल सादर करताना संपूर्ण राज्याची सद्य:स्थिती काय आहे याचा अहवाल तयार केला जातो.गरोदर मातांना सर्व शासकीय आरोग्य संस्थांमध्ये खालील सुविधा मोफत मिळतात.1 प्रसूती, मोफत सिझेरियन (शस्त्रक्रिया)2 प्रसूतीसंदर्भातील औषधे व अन्य साहित्य3 प्रयोगशाळेतील आवश्यक तपासण्या4 प्रसूतीपश्चात मातेला आहार5 प्रसूतीसाठी लागणारा आवश्यक रक्तपुरवठा6 प्रसूतीसाठी घरापासून रुग्णालयापर्यंत वाहनव्यवस्था.7 एका आरोग्य संस्थेतून पुढील संदर्भ सेवा देण्यासाठी दुसऱ्या आरोग्य संस्थेत पोहोचविण्यासाठी वाहनव्यवस्था. 8 प्रसूतीपश्चात आरोग्य संस्थेतून घरी पोहोचविण्यासाठी वाहनव्यवस्था.9 शासकीय आरोग्य संस्थेमध्ये गरोदर मातेस विनाशुल्क उपचार देण्यात यावेत. वरील सारणीवरून असे लक्षात येते की, महाराष्ट्रातील मातामृत्यूचे प्रमाण जास्त आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने जननी शिशू सुरक्षा कार्यक्रम जाहीर केला आहे. महाराष्ट्र राज्यातील सध्याचे मातामृत्यूचे प्रमाण देशाच्या तुलनेत कमी आहे. केंद्र सरकारतर्फे जननी शिशू सुरक्षा कार्यक्रम राबविला जातो आहे, अशी माहिती एनआरएचएमकडून (नॅशनल रुरल हेल्थ मिशन- राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान) मिळाली.नवजात अर्भकांसाठीच्या मोफत सुविधा०-३० दिवसांपर्यंत अर्भकांना सर्व शासकीय आरोग्य संस्थांमध्ये आरोग्यसेवा.औषधे व साहित्य पुरवठा.जिल्हा व उपजिल्हा रुग्णालयांमध्ये रुग्णांसाठी नाममात्र दरावर आहार उपलब्ध आहे. रक्तपुरवठा- गरोदरपण प्रसूतीअंतर्गत व प्रसूतीपश्चात मातेला तीव्र रक्ताक्षय प्रसूतीपश्चात रक्तस्राव, सिझेरियन शस्त्रक्रियेच्या मातेस रक्तपुरवठा करण्याची आवश्यकता भासल्यास मोफत रक्तपुरवठा. शिशू जननी सुरक्षा कार्यक्रम अतिशय उपयुक्त ठरत आहे. विशेषत: ग्रामीण भागात याचा प्रभाव बघायला मिळतो. त्यामुळे मातामृत्यूचे प्रमाणदेखील घटले आहे. त्यासाठी शासन स्तरावर मोठे प्रयत्न केले जातात. हा उपक्रम वर्षभर राबविला जातो. -डॉ. आर.टी. चव्हाण,विभागीय उपसंचालक,आरोग्य सेवारुग्ण फी न आकारणेगरोदर मातांना प्रसूतीसाठी व प्रसूतीपश्चात येणाऱ्या मातांना तसेच ३० दिवसांपर्यंत नवजात अर्भकांना बाह्यरुग्ण, आंतररुग्ण फी, प्रयोगशाळा तपासणी फी असे कोणतेही शुल्क आकारू नये.नवजात शिशूंना मोफतसंदर्भ सेवा देणे.मृत्यूचे प्रमाण वाढण्याची कारणेजनजागृतीची कमतरता, सुविधांचा लाभ पोहोचण्यात अडचणी, सुरक्षिततेचा अभाव , अज्ञान , अंधश्रद्धा व आततायीपणा