केऱ्हाळा : गावातील पांढरी परिसरातील ट्रान्सफार्मर बंद पडल्याने अर्धे गाव मागील पंधरा दिवसांपासून अंधाराचा सामना करीत आहे. त्यामुळे गाव तसं चांगलं, पण अंधारात गुरफटलं, अशी म्हणण्याची वेळ आली. महावितरणच्या गलथान कारभाराने गावकरी हतबल झाले आहेत. होणाऱ्या त्रासामुळे नागरिक सोशल मीडियाच्या माध्यमातून गावपुढाऱ्यांना धारेवर धरीत आहेत. परिणामी, नागरिकांच्या रोषामुळे गावपुढाऱ्यानांही मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
केऱ्हाळा गावाला विद्युत पुरवठा करण्यासाठी विविध भागात १२ सिंगल फेज ट्रान्सफार्म बसविण्यात आले आहे; परंतु या तीन चार वर्षात असे कधीच घडले नाही, की गावातील एखाद्या भागातील ट्रान्सफार्मर जळालेले नाही. कारण दोन तीन वर्षांपासून महावितरणच्या कोणत्या ना कोणत्या कारणाने नागरिकांना कायमच अंधाराचा सामना करावा लागला.
----
या भागातील ट्रान्सफार्मर नादुरुस्त
महादेव मळा डिपीवरील एक, पांढरी डीपीवरील तीन अशा चार ट्रान्सफार्मर नादुरुस्त असल्यामुळे ग्रामस्थांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. मागील अनेक वर्षांपासून गाव पुढारी महावितरण कंपनीकडे पत्रव्यवहार करीत आहे; परंतु असे कधीच घडले नाही की, पत्राच्या आधारे गावातील लाइनची समस्या सोडविली गेली. त्यामुळे नागरिकांनाही लाईटची समस्या मिटेल, असे वाटत नाही.
----
(फोटो : केऱ्हाळा येथील डी.पी.चे मागील दहा ते पंधरा दिवसांपासून ट्रान्सफार्म जळाले आहे.) ृ
130721\img_20210713_173714_1.jpg
केऱ्हाळा गावातील पांढरी परिसरातील ट्रान्सफार्मर नसलेले रोहीत्र