परतूर: रोजगार हमी योजनेवरील मजुरांना केलेल्या कामाचे अर्धेच पैसे देण्यात आले. उर्वरित पैसे देण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. विचारणा केली असता कामावरील अभियंता, ग्रामसेवक व रोजगार सेवक हे उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. परतूर तालुक्यात उन्हाळ्यात शासनाने रोजगार हमीची कामे केली. यामध्ये संबंधित अधिकाऱ्यांनी बराच गोंधळ केला आहे. प्रत्यक्ष काम केलेल्या मजुरांचे पूर्ण देयक न काढता अपात्र लाभार्थ्यांना, वयस्कर व सालगड्यांना तसेच पुढारपण करणाऱ्यांची या योजेनेत नावे घुसडण्यात आली आहेत. या लोकांनी कामे न करताच यांच्या नावावर बँकेत पैसे संबंधित अभियंता, ग्रामसेवक व रोजगार सेवक यांच्या संगनमताने जमा करण्यात आले आहेत. खरे काम करणारे मजूर वंचित ठेवून बोगस मजुरांना लाभ देऊन शासनाची दिशाभूल करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी करून आमचे कामाचे पैसे द्यावेत, अशीही मागणी वलखेड येथील मजुरांनी केली आहे. दरम्यान या प्रकाराची तक्रार पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्याकडेही करण्यात आली आहे. (वार्ताहर)
मजुरांना रोजगार हमीचे अर्धेच पैसे दिले
By admin | Updated: July 25, 2016 00:35 IST