शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
2
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
3
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
4
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
5
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
6
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
7
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
8
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
9
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
10
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
11
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
12
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
13
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
14
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
15
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
16
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
17
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
18
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
19
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
20
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."

सहा हजार मुलांच्या चेहऱ्यावर फुलले हासू!

By admin | Updated: July 19, 2015 00:58 IST

लातूर : दुभंगलेले ओठ आणि टाळू असे जन्मजात व्यंग घेऊन जन्माला आलेल्या मुलांवर दररोज मोफत शस्त्रक्रियेचा यज्ञ गेली दहा वर्ष अखंड चालू आहे़

लातूर : दुभंगलेले ओठ आणि टाळू असे जन्मजात व्यंग घेऊन जन्माला आलेल्या मुलांवर दररोज मोफत शस्त्रक्रियेचा यज्ञ गेली दहा वर्ष अखंड चालू आहे़ डॉ़ विठ्ठल लहाने यांनी ‘स्माईल ट्रेन’ या जागतिक संस्थेच्या मतदतीने लातुरात सुरु केलेल्या या यज्ञात ६ हजार १५० मुलांच्या चेहऱ्यावर हासू फुलले आहे़ देवाने केलेली चूक विठ्ठलाने दुरुस्त केली़, अशी कृतज्ञता डॉक्टरांप्रती या मुलांच्या पालकांनी सर्जरीनंतर व्यक्त केली़ दररोज दोन ते तीन आणि वर्षभरात ६५० ते ७०० सर्जरीचा उपक्रम दहा वर्षांपासून अखंडपणे सुरु आहे़ परिणामी, या बालकांच्या चेहऱ्यावर पुन्हा हास्य फुलले आहे़मुंबईच्या ग्रँट मेडीकल कॉलेजमध्ये प्लास्टिक सर्जनचे पदव्युत्तर पदवी पूर्ण करणारे डॉ. लहाने हे डॉ. बमन डावर यांचे आवडते विद्यार्थी. शिक्षण संपल्यावर जेव्हा डॉ. लहाने यांनी मी लातुरात दवाखाना उघडणार, असे सांगितले तेव्हा डॉ. डावर चकित झाले. त्यांनी आश्चर्याने पाहून विचारले ‘लातूर?’ पण आपला शिष्य काही तरी वेगळे करणार म्हणून त्यांनी लहानेंनी मुंबईला आपल्याजवळच रहावे हा हट्ट सोडला आणि आशिर्वाद दिला. दवाखान्याच्या पहिल्या वर्धापन दिनाला काय करायचे? असा प्रश्न लहाने यांनी आपल्या सौभाग्यवती डॉ. कल्पना आणि भूलतज्ज्ञ डॉ. अजय शहा यांच्यासह साऱ्या सहकाऱ्यांसमोर मांडला. काहीतरी हटके करुयात, असे ठरविल्यानंतर मग दुभंगलेले ओठ आणि टाळूच्या मोफत शस्त्रक्रिया करण्याचे शिबीर घेण्याचे ठरले. एका दिवशी शंभर पेशंट आले. एका दिवसात एवढ्या सर्जरी शक्य नव्हत्या. मग दरवर्षी हा उपक्रम होऊ लागला. चार वर्षात सत्तरएक शस्त्रक्रिया करुनही नंबर न लागणारे लोक आपल्या वर्धापन दिनाची वाट पाहतात हे डॉ. लहाने यांच्या लक्षात आले. याला कायमचे उत्तर काय ? हे शोधण्यासाठी त्यांनी नवी घोषणा केली. आपल्याकडे दुभंगलेल्या ओठ आणि टाळूवर दररोज मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील. आणि गेल्या दहा वर्षात त्यांच्याकडे ‘स्माईल ट्रेन’ या संस्थेंच्या सहकार्याने तब्बल ६ हजार १५० शस्त्रक्रिया झाल्या असून, मुलांना नवा चेहरा मिळाला आहे़ किनगाव येथील दत्ता सोनवणे म्हणाले, माझ्याही मुलाचे ओठ दुभंगलेले़ बोलता आले तरी बोबडे बोलेल, अशी चिंता भेडसावत होती़ परंतु, डॉ़ विठ्ठल लहाने यांनी माझ्या मुलाची मोफत सर्जरी करुन त्याचा चेहरा नवा केला़ ते देवच आहेत़ चांगल्या माणसांकडूनच अशी सेवा घडते़ सामान्य मुलांसारखा चेहरा मिळाला़़़४उदगीर तालुक्यातील रावणगाव येथील सय्यद मुजीब म्हणाले, माझ्या मुलाचे ओठ दुभंगलेले़ डॉ. विठ्ठल लहाने यांची महती मी ऐकलेली होती़ थेट लातूरला आलो आणि डॉक्टर साहेबांची भेट घेतली़ त्यांनी तात्काळ मोफत सर्जरीला माझ्या मुलाचा नंबर लावला़ आज तो चांगला दिसत आहे़ सामान्य मुलांसारखा बोलतो, खेळतो आहे़