शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मुबलक पाणी असूनही सहा दिवसांआड पुरवठा

By admin | Updated: April 18, 2017 00:06 IST

नळदुर्ग : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बोरी धरणात मुबलक पाणीसाठा उपलब्ध असतानाही पालिकेकडून मात्र शहरवासियांना सहा दिवसाआड तासभर पाणीपुरवठा होत आहे

नळदुर्ग : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बोरी धरणात मुबलक पाणीसाठा उपलब्ध असतानाही पालिकेकडून मात्र शहरवासियांना सहा दिवसाआड तासभर पाणीपुरवठा होत आहे. शिवाय मागील आठ दिवसांपासून तर नळाद्वारे पाणीच आले नसल्यामुळे शहरवासियांत संताप व्यक्त होत आहे. नळदुर्ग शहराची लोकसंख्या २० हजारच्या आसपास आहे. शहराला बोरी धरणातून पाणीपुरवठा केला जातो. बोरीधरणावर जॅकवेल असून, तेथे ४० एचपीचा व्हर्टीकल टर्बाईन पंप बसविलेला आहे. जॅकवेलपासून अडीच तीन किमी अंतरावर जलशुद्धीकरण केंद्र व तेथून एक किलोमिटर अंतरावर जलकुंभ बांधण्यात आले आहे. शहरात जवळपास ३४५० घरे असून, फक्त २१०० घरात नळकनेक्शन आहे. प्रत्येक नागरिकांची दैनंदीन पाण्याची गरज ६० लिटर इतकी आहे. शहराची लोकसंख्या व पाण्याची गरज विचारात घेता शहराला दररोज १२ लाख लिटर पाण्याचा पुरवठा होणे अपेक्षित आहे. बोरी धरणावरील व्ही.टी.पंप दर मिनीटाला ८०० लिटर पाणी उपसा करते. धरणावरील पंप दिवसभरात जवळपास २० तासापेक्षा जास्त काळ चालू राहतो. या काळात १० लाख ८ हजार लिटर पाण्याचा उपसा दररोज होतो. असे असतानाही पालिका ५ ते ६ दिवसाआड एक तास पाणी पुरवठा करीत आहे. दररोज १० लाख लिटर पाणी उपसा होवूनसुद्धा नागरिकांना ६ दिवसाआड पाणी मिळू लागल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.आ. मधुकरराव चव्हाण यांनी शहराची पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेवून शहरात नवीन शुद्धीकरण केंद्र, जलकुंभ व जलवाहिन्या निर्माण करण्यासाठी ४ कोटी १९ लाख रुपयाची योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत राबविली. तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी मात्र नकाशाप्रमाणे शहरात पाईपलाईन न टाकता अन्य ठिकाणी टाकल्याने शहरातील जवळपास ९०० नळधारकांना जुन्या पाईप लाईनवरुन पाणी पुरवठा होत आहे. मागच्या टंचाईकाळात सत्ताधारी काँग्रेस पक्ष नळाला पाणी वेळेवर सोडत नाही म्हणून विरोधी बाकावरील राष्ट्रवादीने पालिकेवर गाढव मोर्चा आणून निषेध व्यक्त केला होता. पाणी प्रश्नामुळे काँग्रेसच्या हातून पालिकेची सत्ता गेली व राष्ट्रवादीने निर्विवाद सत्ता मिळविली. आता राष्ट्रवादीचा नगराध्यक्ष असून, त्यांनी २६ डिसेंबर रोजी पालिकेची सुत्रे हाती घेतली. आज ४ महिन्यापेक्षा जास्त कालावधी लोटला तरी पालिकेच्या कामकाजात तसुभरही फरक दिसत नसल्याने नागरिकांत संताप व्यक्त होत आहे. (वार्ताहर)