शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

निम्म्या शहर बसगाड्या धूळखात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 00:26 IST

जवाहरलाल नेहरु नागरी पुनरुत्थान अभियानाअंतर्गत नांदेड महापालिकेला मिळालेल्या शहर बसेस चालविण्याची जबाबदारी महामंडळाने घेतली होती़ परंतु या बससेवेच्या देखभाल आणि दुरुस्तीचा खर्च आवाक्याबाहेर असल्यामुळे पहिल्या काही महिन्यातच या सेवेचे तीन तेरा वाजणार असल्याचे स्पष्ट झाले होते़ आजघडीला ३० पैकी निम्म्याहून अधिक बसेस दुरुस्तीविना धूळखात पडून आहेत़ त्यामुळे नांदेडकरांची मोठी गैरसोय होत आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : जवाहरलाल नेहरु नागरी पुनरुत्थान अभियानाअंतर्गत नांदेड महापालिकेला मिळालेल्या शहर बसेस चालविण्याची जबाबदारी महामंडळाने घेतली होती़ परंतु या बससेवेच्या देखभाल आणि दुरुस्तीचा खर्च आवाक्याबाहेर असल्यामुळे पहिल्या काही महिन्यातच या सेवेचे तीन तेरा वाजणार असल्याचे स्पष्ट झाले होते़ आजघडीला ३० पैकी निम्म्याहून अधिक बसेस दुरुस्तीविना धूळखात पडून आहेत़ त्यामुळे नांदेडकरांची मोठी गैरसोय होत आहे़जेएनएनयुआरएम योजनेअंतर्गत नांदेडात शहर बस सेवेसाठी लालपरी मिळाली होती़ ही सेवा चालविण्यासाठी महापालिकेने कंत्राटदाराची नियुक्तीही केली होती़ परंतु नफ्यात चालणारी ही सेवा कंत्राटदाराच्या चुकीच्या नियोजनामुळे बंद पडली़ त्यानंतर हे काम अकोल्याच्या एका कंपनीला देण्यात आले़ अकोल्याच्या कंपनीवर तर लालपरी भंगारात काढण्याची वेळ आली़ त्यानंतर मिळालेल्या ३० बसेस महापालिकेने एसटी महामंडळाला चालविण्यासाठी दिल्या़परंतु अगोदरच कर्मचाºयांची अपुरी संख्या असलेल्या महामंडळाने उसने अवसान आणून ही जबाबदारी स्विकारली़ परंतु पहिल्या काही महिन्यातच या बसेसच्या दुरुस्तीसाठी लागणारा प्रशिक्षित कर्मचारी वर्ग नसल्यामुळे एक-एक बस दुरुस्तीच्या नावाखाली डेपोत जमा होण्यास सुरुवात झाली़ महामंडळाकडून अनेकवेळा मनपाला पत्रव्यवहार करुन ही बससेवा तोट्यात चालल्याचे कळविण्यात आले़ तर मनपाकडून मात्र महामंडळाच्या चुकांवर बोट ठेवण्यात येत आहे़ या वादात शहर बससेवेचे दिवाळे निघाले़ आजघडीला ३० पैकी १५ हून अधिक बसेस दुरुस्तीच्या नावाखाली डेपोत धूळखात आहेत़रेकॉर्डवर १५ ते १६ बसेस रस्त्यावर धावतात असे दाखविण्यात येत असले तरी, प्रत्यक्षात ही संख्या ६ ते ७ एवढीच आहे़ त्यामुळे नांदेडकरांना नाईलाजाने आॅटोने अधिक पैसे मोजून प्रवास करण्याची वेळ येते़ रेल्वेस्टेशन ते सिडको, हडको, विद्यापीठ या मार्गावर विद्यार्थी संख्या आणि नागरीकांची मोठी गर्दी असते़ परंतु या मार्गावरही मोजक्याच बसेस सोडण्यात आल्या आहेत़ या सर्व प्रकारात नांदेडकरांची प्रचंड गैरसोय होत आहे़