शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

हिमायतनगर तालुक्यात सतर्कतेचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2017 00:53 IST

लोकमत न्यूज नेटवर्क हिमायतनगर: नक्षलवाद्यांचा २६ जुलै ते ३ आॅगस्टदरम्यान शहीद सप्ताह असून त्या पार्श्वभूमीवर हिमायतनगर तालुक्यातील सर्व पोलीस ...

ठळक मुद्देनक्षलवाद्यांकडून घातपात घडविण्याचे प्रयत्न आंध्रा आणि महाराष्ट्र पोलिसांनी ही चळवळ मोडीत काढली़

लोकमत न्यूज नेटवर्कहिमायतनगर: नक्षलवाद्यांचा २६ जुलै ते ३ आॅगस्टदरम्यान शहीद सप्ताह असून त्या पार्श्वभूमीवर हिमायतनगर तालुक्यातील सर्व पोलीस ठाण्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे़ या काळात नक्षलवाद्यांकडून घातपात घडविण्याचे प्रयत्न केले जातात, परंतु गेल्या काही वर्षांत नक्षली कारवाया नसल्यात जमा आहेत़पोलिसांकडून झालेल्या गोळीबारात मृत्यू पावलेल्या नक्षल्यांच्या समर्थनार्थ नक्षलवादी दरवर्षी या काळात नक्षल शहीद सप्ताह पाळतात़ या काळात युवा पिढीला नक्षल संघटनेत सामावून घेण्यासाठी त्यांच्याकडून अधिक प्रयत्न करण्यात येतात़हिमायतनगर तालुक्यातील तेलंगणा राज्य सीमेवरील म्हैसा, निर्मल, आदिलाबाद, कामारेड्डी, करिमनगर, संगारेड्डी तर महाराष्ट्रातील किनवट, माहूर, मांडवी, विदर्भातील उमरखेड, यवतमाळ, पांढरकवडा, महागाव, दारव्हा, दिग्रस आदी भागांत २० वर्षांपूर्वी नक्षलवादी सक्रिय होत, परंतु आंध्रा आणि महाराष्ट्र पोलिसांनी ही चळवळ मोडीत काढली़त्यात गेल्या अनेक वर्षांत कोणतीही मोठी घटना घडली नाही, परंतु दरवर्षी या काळात सतर्कतेच्या दृष्टीने पोलिसांकडून खबरदारी बाळगण्यात येते़ त्या दृष्टीने सर्व पोलीस ठाण्यांना तशा सूचना देण्यात आल्या आहेत़