शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

गारपिटीतील नुकसानीचे पंचनामे रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2017 23:52 IST

लातूर :कृषिमंत्र्यांनी नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. मात्र १० दिवस उलटले तरी अद्याप कुठल्याही गावाच्या नुकसानीचा अहवाल प्राप्त झालेला नाही.

लातूर : १५ मार्च रोजी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे लातूर, औसा तालुक्यात मोठ्या प्रमाणात रबी पिकांचे नुकसान झाले. द्राक्ष बागा व आंब्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पालकमंत्र्यांसह कृषिमंत्र्यांनी महसूल व कृषी यंत्रणेला नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. मात्र १० दिवस उलटले तरी अद्याप कुठल्याही गावाच्या नुकसानीचा अहवाल प्राप्त झालेला नाही. १५ व १६ मार्च असे दोन दिवस लातूर जिल्ह्यात अवकाळीने कहर केला होता. औसा तालुक्यात जवळपास २२ हजार हेक्टर तर लातूर तालुक्यात साडेआठ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला होता. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवकांची गावस्तरावर समिती स्थापन करून या समितीकडून नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. आता १० दिवस उलटले तरी अद्याप एकाही गावाच्या नुकसानीचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडे उपलब्ध झालेला नाही. पंचनामे चालू असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. आणखीन पाच ते सहा दिवस पंचनाम्याला वेळ लागणार आहे. दोन दिवस झालेल्या गारपिटीमुळे नुकसानीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता यंत्रणेला आहे. त्यामुळे पंचनाम्याला वेळ लागू शकतो, असे जिल्हा कृषी कार्यालयातून सांगण्यात आले. जिल्ह्यात सगळीकडे अवकाळी पाऊस झाला असला, तरी केवळ औसा, लातूर आणि अहमदपूर या तालुक्यांतच गारपिटीमुळे नुकसान झाले असल्याचे म्हणणे सरकारी यंत्रणेचे आहे. (प्रतिनिधी)