शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
3
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
4
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
5
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
6
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
7
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
8
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
9
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
10
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
11
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
12
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
13
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
14
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
15
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
16
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
17
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
18
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
19
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"

‘जय भद्रा’चा जयघोष

By admin | Updated: August 3, 2014 01:11 IST

खुलताबाद : ‘भद्रा हनुमान की जय’ म्हणत श्रावण महिन्याच्या पहिल्याच शनिवारी लाखो भाविकांनी येथील भद्रा मारुतीचे दर्शन घेतले. शनिवारी दिवसभर खुलताबादनगरी हनुमान भक्तांनी दुमदुमली होती.

खुलताबाद : ‘भद्रा हनुमान की जय’ म्हणत श्रावण महिन्याच्या पहिल्याच शनिवारी लाखो भाविकांनी येथील भद्रा मारुतीचे दर्शन घेतले. शनिवारी दिवसभर खुलताबादनगरी हनुमान भक्तांनी दुमदुमली होती.श्रावण महिन्यातील शनिवारी भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने भाविक येत असतात. त्यात औरंगाबाद शहर परिसरातून पायी येणाऱ्या भाविकांची संख्या जास्त असते. त्याचबरोबर नगर, नाशिक, जळगाव, धुळे, जालना जिल्ह्यातूनही भाविक मोठ्या संख्येने येतात. शुक्रवारी रात्रीच अनेक ठिकाणच्या दिंड्या, पालख्या खुलताबादेत दाखल झाल्या होत्या.श्रावणातील पहिलाच शनिवार असल्याने शुक्रवारी रात्रीपासूनच पायी येणाऱ्या भाविकांचे जत्थेच्या जत्थे खुलताबादेत दाखल होत होते. शुक्रवारी रात्रीपासून औरंगाबाद-खुलताबाद रस्ता भक्तांनी फुलून गेला होता. भाविकांच्या गर्दीने वाहतूक खोळंबत होती. रात्रीपासूनच लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्या शनिवारी रात्री उशिरापर्यंत तशाच होत्या. संस्थानतर्फे स्पेशल दर्शन ५० रुपये ठेवण्यात आले होते. स्पेशल दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. मंदिरात अनेक भाविकांनी चहा-पाणी, केळी, साबुदाणा खिचडीचे वाटप केले. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता एस.टी. महामंडळाच्या वतीने जादा बसेसची व्यवस्था करण्यात आली होती, तर औरंगाबाद मार्गावर सिटीबस सोडण्यात आल्याने भाविकांनी याचा लाभ घेतला. मोठ्या प्रमाणावर हार, फुले, नारळ व प्रसादाची विक्री झाली होती. भाविकांचे दर्शन सुरळीत व्हावे म्हणून भद्रा मारुती संस्थानचे अध्यक्ष काशीनाथ बारगळ, सचिव कचरू बारगळ, सुरक्षा अधिकारी राजेंद्र जोंधळे व त्यांचे सहकारी परिश्रम घेत होते. (वार्ताहर)