शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

भोकरदनमध्ये सतरा लाखांचा गुटखा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 01:14 IST

शहरात साठा केलेल्या अवैध गुटखा गोदामावर अन्न व औषधी प्रशासन व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून १७ लाख ३ हजार ९५० रूपयांचा गुटखा व पानमसाला जप्त केला.

लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : शहरात साठा केलेल्या अवैध गुटखा गोदामावर अन्न व औषधी प्रशासन व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून १७ लाख ३ हजार ९५० रूपयांचा गुटखा व पानमसाला जप्त केला. शहरातील अत्तार गल्ली भागात गुरुवारी मध्यरात्रीनंतर ही कारवाई करण्यात आली.शहरातील मकरज मशीद परिसरातील न्यू हायस्कूल रस्त्यालगतच्या भागात अवैध गुटखा साठवून ठेवल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांनी याबाबत अन्न प्रशासनाच्या औरंगाबाद विभागाचे सहआयुक्त सी़ बी़ पवार यांना माहिती दिली.गुरुवारी मध्यरात्रीनंतर शहरातील पोलीस व अन्न प्रशासनाच्या अधिका-यांनी मरकज मज्जीद न्यू हायस्कुल रोड येथील मोहमद कमर मोहमद कादर यांच्या मालकीच्या घराची झडती घेतली असता, हिरा, विमल , आरएमडी पानमसाल्याचे २ लाख ४४ हजार २५० रूपये किमतीचे १० पोते आढळून आले.या प्रकरणी अन्न प्रशासनाने संशयित मुजाहेद रफिक शेख (२५, रा. अत्तारगल्ली) यास ताब्यात घेतले. याच परिसरातील युनूस मास्टर यांच्या घराची झडतीत हिरा, रॉयल टोबॅकोच्या १४ लाख ९९ हजार ७००, असा एकूण १७ लाख ३ हजार ९५० रूपयांचा गुटखा ताब्यात जप्त केला.गुरुवारी मध्यरात्री सुरू झालेली ही कारवाई शुक्रवारी पहाटेपर्यंत सुरू होती.या प्रकरणी संशयित मुजाहेद रफिक शेख, शाकेर ताहेर खान या दोघांवर अन्न सुरक्षा कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे.अन्न सुरक्षा अधिकारी संजय चटटे, प्रज्ञा सुरसे, प्रल्हाद क्षीरसागर, डॉ. राम मुंढे, पोलिस निरीक्षक दशरथ चौधरी, गुन्हे शाखेचे गोकुळसिंग कायटे, विनोद गडदे, सम्युअल कांबळे, सचिन चौधरी, सदाशिव राठोड, विलास चेके यांनी ही कारवाई केली.