शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यकीय देयकांसाठी गुरुजींची दमछाक

By admin | Updated: May 16, 2017 23:20 IST

बीड : आजारपणात उपचारावर झालेल्या खर्चाचे देयके प्राप्त करताना शिक्षकांची अक्षरश: कसोटी लागत आहे.

संजय तिपाले। लोकमत न्यूज नेटवर्कबीड : आजारपणात उपचारावर झालेल्या खर्चाचे देयके प्राप्त करताना शिक्षकांची अक्षरश: कसोटी लागत आहे. जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे शिक्षकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. आजघडीला शेकडोवर संचिका तुंबल्या असून दोन वर्षे प्रतीक्षा करुनही काहींच्या संचिका धूळ खात पडून असल्याची माहिती समोर आली आहे.जिल्हा परिषदेत शिक्षण विभागाची सर्वात मोठी आस्थापना आहे. २९०० हून अधिक शाळा व ९ हजारापेक्षा अधिक शिक्षक कार्यरत आहेत. महिन्याकाठी जवळपास ३० ते ४० शिक्षकांच्या वैद्यकीय प्रतिपूर्ती देयकाच्या संचिका गटशिक्षणाधिकारी कार्यालयातून शिक्षण विभागात सादर होतात. वैद्यकीय देयके तात्काळ मिळणे अपेक्षित आहे. मात्र, खेटे मारल्याशिवाय देयके मिळतच नाहीत, अशा तक्रारी आहेत. आधीच आजारामुळे संकटात सापडलेल्या शिक्षकांना सर्व कागदपत्रांची पूर्तता करुनही देयकांसाठी शिक्षण विभागाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. २ लाखांपर्यंतच्या वैद्यकीय बिलाची संचिका तपासून सीईओंच्या मान्यतेने जिल्हा शल्यचिकित्सकांकडे पाठवावी लागते. २ लाखांपुढील देयके विभागीय आयुक्त तर त्यापेक्षा अधिक खर्चाची देयके मंत्रालयातून मंजूर होतात. शिक्षण विभागात दाखल झालेल्या संचिका पुढे सरकत नसल्याने शिक्षकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्या शंभरपेक्षा अधिक संचिका प्रलंबित असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यापैकी काही संचिका दोन वर्षांपूर्वीच्या आहेत. त्यामुळे शिक्षकावर पदरमोड करण्याची वेळ आली आहे.अडवणूक थांबवा, अन्यथा आंदोलनवैद्यकीय बिलांसाठी शिक्षकांची अक्षरश: पिळवणूक होते. संबंधित कर्मचारी कार्यालयात भेटत नाहीत. त्यामुळे देयक मिळविण्यासाठी दूरदूरहून आलेल्या शिक्षकांची वेळ, पैसा व श्रम वाया जातात. यासंदर्भात यापूर्वीच शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन दिलेले आहे; परंतु कार्यपद्धतीत सुधारणा झालेली नाही. अडवणूक न थांबल्यास तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा भारतीय बहुजन कर्मचारी कल्याण महासंघाचे राज्याध्यक्ष विजयकुमार समुदे्रे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिला आहे.