शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

स्नेहाच्या मदतीला धावून आले गुरुजी

By admin | Updated: July 17, 2014 01:10 IST

लोहारा : प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर बिकट परिस्थितीवर मात करुन लोहारा येथील स्नेहा मठपती या विद्यार्थिनीने दहावीच्या परीक्षेत उत्तुंग भरारी घेतली.

लोहारा : प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर बिकट परिस्थितीवर मात करुन लोहारा येथील स्नेहा मठपती या विद्यार्थिनीने दहावीच्या परीक्षेत उत्तुंग भरारी घेतली. मात्र पुढील शिक्षणासाठी आर्थिक चणचण अडसर ठरत होती. यासंदर्भात ‘लोकमत’ ने आवाहनात्मक वृत्त प्रकाशित केले होते. या आवाहनाला तालुक्यातील गुरुजींनी प्रतिसाद देत, स्नेहाच्या मदतीला धावून आले. त्यांनी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत केली आहे. या जोरावरच स्नेहा आता लातूर येथील एका नामांकित महाविद्यालयात पुढील शिक्षण घेत आहे.अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत स्नेहा मठपती या विद्यार्थिनीने पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण लोहारा येथेच पूर्ण केले. चौथी आणि सातवीमध्येही स्नेहा शिष्यवृत्तीधारक बनली होती. आई-वडील मोलमजुरी करुन तिच्या शिक्षणाचा खर्च भागवत होते. मात्र स्नेहा जसजशी वरच्या वर्गात जावू लागली तसतसा शिक्षणाचा खर्च वाढत गेला. मात्र कुठल्याही परिस्थितीत हार मानायची नाही. हे ध्येय उराशी बाळगून आई-वडील संसाराचा गाडा हाकून स्नेहाच्या शिक्षणासाठी पैसा पुरवत असत. दहावीच्या वर्गामध्ये गेल्यानंतर स्नेहाने रात्रीचा दिवस करुन अभ्यास केला. आणि आई-वडिलांच्या अपेक्षाची पूर्ती केली. ९६ टक्के गुण घेत यश संपादन केले. एकीकडे स्नेहाच्या यशाने आनंद झालेला असतानाच दुसरीकडे आई-वडिलांना पुढील शिक्षणाच्या खर्चाची चिंता सतावत होती. यासंदर्भात ‘लोकमत’ने आवाहनात्मक वृत्त प्रकाशित केले होते. ‘लोकमत’ने केलेल्या या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्हा परिषद सदस्या मीरा अविनाश माळी यांनी स्नेहाला दोन वर्षांसाठी आवश्यक असणारे सर्व साहित्य देणार असल्याचे सांगितले. त्यानंतर केंद्रप्रमुख मनोहर वाघमोडे यांनी स्नेहाच्या वडिलाची भेट घेवून तिला लातूर येथे पुढील शिक्षणासाठी पाठवा असा सल्ला दिला. मात्र यावेळी स्नेहाच्या वडिलांनी आर्थिक परिस्थिती बेताची असल्याचे सांगत, ते आपल्या आवाक्याबाहेर असल्याचे म्हटले होते. त्यावर वाघमोडे यांनी ‘पैशाची चिंता करु नका, मी निधी जमा करतो’ असे सांगत दिलासा दिला. त्यानुसार केंद्रप्रमुख वाघमोडे यांनी पुढाकार घेत, जिल्हा परिषद, खाजगी शाळातील शिक्षकांना मदतीचे आवाहन केले होते. त्यानुसार ५० हजार रुपये मदत देण्याचे निश्चित झाले. आजवरच ३५ हजार रुपये जमा झाले असून, उर्वरित रक्कमही जमा करण्याचे काम सुरु असल्याचे वाघमोडे म्हणाले. (वार्ताहर)