शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
2
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
5
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
6
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
7
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
8
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
9
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
10
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
11
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
12
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
13
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा

By बापू सोळुंके | Updated: September 29, 2024 19:51 IST

निवडणूक लढायची कि पाडायचं हे २४ ऑक्टोबरला सांगू

छत्रपती संभाजीनगर : गुज्जर, पटेल यांचं आंदोलन तुम्ही कसेही हाताळाले असेल पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे. तुम्ही चांगल्या भूमिकेतून आंदोलन हाताळणार असाल तर ठीक आहे. पण आरक्षण न देता आंदोलन हाताळू पहात असाल तर ही शाह यांची मोठी चूक ठरेल, असा थेट इशारा मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी भाजपाचे वरिष्ठ नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना रविवारी येथे पत्रकार परिषदेत दिला.

नऊ दिवसांच्या उपोषणामुळे प्रकृती खालावल्याने जरांगे पाटील हे बुधवार रात्रीपासून शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहे. रविवारी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. अमित शाह यांचा नुकताच छत्रपती संभाजीनगरचा दौरा झाला. या दौऱ्यात त्यांनी आंदोलने होतच राहतात. ते कसे हाताळायचं हे आम्हाला माहिती आहे, असे पदाधिकाऱ्यांना सांगितले.

शाह यांच्या या विधानाकडे जरांगे यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, ते काय उद्देशाने बोलले ते माहीत नाही. चांगल्या भूमिकेने आंदोलन हाताळणार असाल तर ठीक आहे. जर मराठा कुणबी एकच असल्याचा कायदा केला तर ते त्यांना परवडेल. मराठ्यांना आरक्षण दिलं तर तुम्हाला सत्तेपासून कुणी रोखू शकत नाही. अन्यथा चहा प्यायची वेळ येईल. तुमची आंदोलन हाताळायची पद्धत मला चांगली नाहीत आहे. मी सगळ्या अंदोलनाचा अभ्यास केला. आरक्षण न देता आंदोलन हाताळू म्हणत असाल तर ही शाह यांची मोठी चूक होईल. गुज्जर, पटेल यांच्या आंदोलना प्रमाणे हाताळून तर बघा, असे आव्हानच त्यांनी दिले. निवडणुक जवळ आल्यावर आणि आंदोलनाला १३ महिने झाल्यावर तुम्ही आंदोलनावर बोलता,असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. 

निवडणूक लढायची कि पाडायचं हे २४ ऑक्टोबरला सांगूमंत्री छगन भुजबळ यांनी राज्यात २८८ उमेदवार उभे करण्याचे आवाहन तुम्हाला दिले आहे, याकडे तुम्ही कसे पाहता असे विचारले असता जरांगे पाटील म्हणाले, निवडणूक लढवायची की नाही ते वेळ आल्यावर सांगू. .सगळं मलाच पाहजे या इर्षेचा भुजबळ सारखा माणूस नाही. धनगर समाजाची एस.टी. प्रवर्गातून आरक्षणाची मागणी योग्य असल्याचे त्यांनी नमूद केले.

भाजपाला मराठा, गुज्जर, मुसलीम यांना मोठ्या जाती संपवायचा आहे. पटेल गुज्जर जाट लोकांचं आंदोलन मोडून काय मिळवलं तुम्ही? हे अधिक दिवस चालत नाही. तुमची हाताळायची पद्धत सगळ्या माहित सगळे कंटाळले आहे.काम करण्याची खुनशी वृत्ती तुम्हाला संपवणार आहे.

नारायणगडावरील दसरा मेळावा परंपरेचादसरा मेळाव्यासंदर्भात गड काय ठरवेल ती भूमिका महत्वाची आहे. गडाची भूमिका राजकीय नाही. तिथे परंपरेचा दसरा मेळावा असतो. जातीचा किंवा राजकारणाचा नाही. मी त्या मेळाव्यात जा जाऊन आशीर्वाद घेणार असल्याचे जरांगे यांनी सांगितले.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलAmit Shahअमित शाह