शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समितीची विनानिविदा कामे

By admin | Updated: June 3, 2016 23:48 IST

औरंगाबाद : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील वर्षभरात वेगवेगळ्या कामांसाठी करण्यात आलेला खर्च नियमबाह्य आहे.

औरंगाबाद : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील वर्षभरात वेगवेगळ्या कामांसाठी करण्यात आलेला खर्च नियमबाह्य आहे. कोणत्याही वर्तमानपत्रात जाहिरात न देता परस्पर जास्त दरात सामान खरेदी करण्यात आले. त्यामुळे बाजार समितीचे आर्थिक नुकसान झाल्याचा ठपका जिल्हा विशेष लेखा परीक्षकांनी ठेवला आहे. औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीमधील संचालक दामोदर नवपुते व रघुनाथ काळे आदी संचालकांनी बाजार समितीने मागील वर्षात संचालकांना अंधारात ठेवून तसेच निविदा न मागविता अतिरिक्त केलेल्या खर्चाबद्दल जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रार केली होती. त्यानुसार बाजार समितीला खुलासा सादर करण्यास सांगण्यात आले. पण बाजार समितीने दिलेल्या अहवाल समाधानकारक नसल्याने अखेर जिल्हा उपनिबंधकांनी जिल्हा विशेष लेखा परीक्षकांना चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. अहवालात अनेक बाबींवर लेखा परीक्षकांनी ठपका ठेवला आहे. अहवालात म्हटले आहे की, बाजार समितीने खुर्च्या खरेदीसाठी तीन निविदा मागविणे अपेक्षित होते. मात्र ज्या एजन्सीकडून खुर्च्या खरेदी केल्या, त्याचीच निविदा मागविली होती. ए.सी. खरेदीसाठी बाजार समितीने वर्तमानपत्रात जाहिरात दिली नाही. ज्यांच्याकडून एसी खरेदी केला, ती एजन्सी एसी बनविणाऱ्या त्या कंपनीची अधिकृत डीलर नाही. शेतकरी निवासासाठी गिझर खरेदी करताना निविदा मागविण्यात आल्या नाहीत. ज्या विभागास स्टेशनरीची आवश्यकता होती, त्यांची एकत्रित मागणी नसताना मोघम ३ लाखांची मंजुरी देणे योग्य नव्हते. त्यामुळे प्रत्यक्षात येणाऱ्या खर्चाचा आढावा घेतल्याचे आढळून आले नाही.