औरंगाबाद : गेल्या साडेतीन वर्षांत महावितरणचे जीटीएलने वीज बिलापोटी ३५४ कोटी रुपये थकविले आहेत. शहरातील वीज ग्राहकांकडून जीटीएल सक्तीने बिलाची वसुली करीत आहे. जीटीएलने शहरातील वीज गळती कमी केली नाही, महसुलात वाढही केली नाही. त्यामुळे वीज कर्मचारी, अधिकारी, अभियंता संयुक्त कृती समितीच्या वतीने जीटीएल हटाव मोहीम हाती घेतली आहे. ‘लोकमत’ने गुरुवारी हॅलो औरंगाबादमध्ये ‘जीटीएलची पोबाऱ्याची तयारी’ या मथळ्याखाली बातमी प्रकाशित केली आहे. बातमीची दखल घेऊन वीज कर्मचारी, अधिकारी, अभियंता संयुक्त कृती समितीच्या वतीने बैठक घेण्यात आली. या बैठकीत जीटीएल हटाव मोहिमेचा निर्णय घेण्यात आला. समितीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे निर्णयाची माहिती दिली आहे. जीटीएलची थकबाकी दिवसेंदिवस वाढतच आहे. महावितरणने अनेक वेळा जीटीएलला कंत्राट तोडण्याची नोटीसही देलेली आहे. जीटीएल कारभारात सुधारणा करीत नाही. त्यामुळे समितीच्या वतीने मोहीम हाती घेऊन जीटीएलकडून वीज वितरणाचे कंत्राट रद्द करून पुन्हा महावितरणला द्यावे यासाठी ७ नोव्हेंबर रोजी विद्युत भवन, जुबिली पार्क, मिलकॉर्नर येथे दुपारी १.३० वा. द्वारसभा आयोजित केली आहे.
जीटीएल चले जाओ मोहीम
By admin | Updated: November 7, 2014 00:53 IST