शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

खादी कापडांवरील ‘जीएसटी’ आजपासून रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 00:35 IST

केंद्र सरकारने गांधी जयंतीचे औचित्य साधून खादी कापडावरील जीएसटी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

राम शिनगारे ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि खादी हे अतूट नाते आहे. यामुळे पहिल्यापासून खादीला करांमधून विशेष सूट देण्यात येते. १ जुलैपासून देशभर लागू झालेला ‘वस्तू आणि सेवाकर’ (जीएसटी) खादीवर ५ ते १२ टक्के आकारण्यात येत होता. या कराचा फटका खादी उद्योगाला बसला. शेवटी केंद्र सरकारने गांधी जयंतीचे औचित्य साधून खादी कापडावरील जीएसटी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.स्वातंत्र्याच्या संघर्षात खादी कापड सर्वांच्या प्रेरणेचे, अस्मितेचे प्रतीक बनले होते. महात्मा गांधी यांनी खादीला प्रोत्साहन दिले. ते स्वत: दररोज चरख्यावर कापड विणत, त्यामुळे कार्यकर्त्यांनाही खादीचे विशेष आकर्षण होते. स्वातंत्र्यानंतरही खादी घालणे हे गांधी विचारांचे प्रतीक मानले जाई. पुढे खादी घालणारे म्हणजे पुढारी अशीही प्रतिमा तयार झाली. या खादीची लोकप्रियता वाढविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही प्रयत्न केले; मात्र खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या यावर्षीच्या दिनदर्शिकेवरील गांधीजींचे छायाचित्र हटवून त्या जागी पंतप्रधान मोदी यांचे छायाचित्र लावले. यावरून देशभर आरोप-प्रात्यारोपाच्या फैरी झडल्या होत्या. याच खादी कपड्यांवर १ जुलैपासून देशभर लागू झालेला जीएसटी कर आकारण्याचा निर्णय झाला.या निर्णयामुळे अगोदरच अडचणीत असलेला खादी उद्योग जास्तच अडचणीत सापडला. याचा परिणाम जीएसटी लागू झाल्यापासून खादी कपड्यांच्या विक्रीत तब्बल २० टक्क्यांपेक्षा अधिक घट झाली. याची दखल घेत खादी मंडळाने जीएसटी परिषदेसमोर खादी कापडांच्या विक्रीमध्ये झालेल्या घटीचे सादरीकरण केले. हा कर कायम ठेवला तर खादी उद्योग बंद पडू शकतो, असेही स्पष्ट केले. एकीकडे पंतप्रधान मोदी खादीच्या प्रसारासाठी प्रयत्न करतात. युवकांना खादी वापरण्याचे आवाहन करतात, तर दुसरीकडे खादीच्या कपड्यांवर कर आकारण्यात येतो. काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात खादीवर कर आकारण्यात येत नव्हता, असेही जीएसटी परिषदेच्या लक्षात आणून दिल्याचे मराठवाडा खादी ग्रामोद्योग समितीचे अध्यक्ष ना. वि. देशपांडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. यानंतर जीएसटी परिषदेने खादीच्या कापडावरील कर रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी गांधी जयंतीपासून (२ आॅक्टोबर) करण्यात येणार असल्याचेही देशपांडे यांनी सांगितले.