शहरं
Join us  
Trending Stories
1
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
2
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
3
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
4
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
5
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
6
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
7
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
8
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
9
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
10
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
11
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
12
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
13
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
14
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
15
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
16
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
17
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
18
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
19
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
20
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल

किराणा माल काही प्रमाणात स्वस्त

By admin | Updated: August 26, 2015 00:30 IST

शिरीष शिंदे , बीड दुष्काळामुळे भाजीपाल्याचे भाव वाढत चालले आहे तर दुसऱ्या बाजुला तीन प्रकारच्या दाळी सोडल्या तर इतर किराणा मालातील साहित्य स्वस्त झाले असल्याची बाब

शिरीष शिंदे , बीडदुष्काळामुळे भाजीपाल्याचे भाव वाढत चालले आहे तर दुसऱ्या बाजुला तीन प्रकारच्या दाळी सोडल्या तर इतर किराणा मालातील साहित्य स्वस्त झाले असल्याची बाब ‘लोकमत’ने केलेल्या सर्व्हेक्षणानुसार समोर आली आहे. या वृत्तामुळे दुष्काळात होरपळणाऱ्या लोकांना काहीसा दिलासा मिळणार आहे. दुष्काळामुळे अन्नधान्य उत्पादन केल्याने बाजारात शेंगादाणे, दाळी यांची आवक घटली असली तरी इतर साहित्य बाहेर राज्यातून येत असल्याने बाजारात माल मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. मात्र, दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने शेकऱ्यांकडे पैसे नाहीत. त्यामुळे बाजारपेठा ठप्प पडल्या असल्याचे व्यापारी सांगत आहेत. ग्राहक दुकानात आले तरी फारशी मोठी खरेदी केली जात नाही. जेवढ लागेल तेवढच खरेदी करण्याची मानसिकता निर्माण झाली आहे. याचा फटका बाजारपेठेस बसला आहे हे सर्वेक्षणातून समोर आली आहे.तूर, उडीद, मसूर दाळीचे भाव वाढलेजिल्ह्यात तूर, उडीद, मसूर या दाळींचे उत्पादन नसल्यामुळे व आवक घटल्यामुळे त्यांचे भाव वाढले आहेत.तूर दाळीची आवक मोठ्या प्रमाणात व्हायची मात्र दुष्काळाचे सावट असल्याने नवीन तुर लागवड झाली नाही. पूर्वी तुर दाळीचे भाव १०० रुपये प्रतिकिलो होते मात्र हेच दर आता १३० ते १४० प्रतिकिलो रुपये झाले आहेत. भाव अनपेक्षितपणे वाढले असल्याने अनेकांना ही दाळ खरेदी करणे अवघड बनले आहे. तीन महिन्यांपूर्वी उडीद दाळ ७० ते ९० रूपये प्रतिकिलो दरम्यान होती. परंतु आता उडीद दाळीचे भाव १२० रूपये किलो झाले आहेत. ही वाढ जवळपास ५० रूपयांची आहे. तसेच मसूरदाळची आवक हरभऱ्याप्रमाणे कमी झाली आहे. त्यामुळे मसूरदाळ ७५ रूपयांवरून ८५ ते ९० रूपये प्रतिकिलोवर जाऊन पोहोचली आहे.साबुुदाना झाला स्वस्तसध्या सणासुदीचे दिवस असून श्रावण महिना सुरु आहे. त्यातच साबुुदान्याच्या किंमती घटल्या आहेत. पूर्वी साबुुदाणा ६० ते ६५ रुपये प्रति किलो होता. आता त्याचा भाव ५० रुपये प्रति किलो झाला आहे. यामुळे उपवास करणाऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. तामिळनाडू राज्यातील सेलम येथे साबुुदान्याचे उत्पादन अधिक झाल्याने भाव उतरले आहेत. हरभरा वाढलाहरभऱ्याचा प्रतिकिलोचा भाव ४० ते ५० रुपयांच्या दरम्यान होता. तो आता ६० ते ६५ रुपये प्रतिकिलो झाला आहे. बाजारात हरभऱ्याची आवक कमी झाल्याने हे भाव वाढले. मूग दाळीचे भाव घसरलेमूग दाळीचे भाव अनपेक्षितरीत्या घसरले आहेत. पूर्वी मूग दाळ प्रती ११० ते १२० रुपये किलो होती. आता हे भाव ८० ते ९० रुपये प्रतिकिलो झाले आहेत. नवीन मुगाची आवक झाल्यामुळे हे भाव उतरले असल्याचे व्यापारी सांगत आहेत. मटकी झाली महागमटकी काही दिवसांपूर्वी ८० ते ९० रूपये प्रतिकिलो विकली जात होती. परंतु आता हे भाव ११० रूपये प्रतिकिलोवर जाऊन ठेपले आहेत. यामुळे अनेकांनी मटकी खरेदीकडे दुर्लक्ष केले आहे. अनेकांना मटकी खरेदी करणे परवडणारे नाही.साखरेत अल्पशी वाढसहा महिन्यांपूर्वी साखर ३२ रूपये किलो होती. त्यानंतर साखर २२ रूपयांवर गेल्या १५ दिवसांपूर्वी होती. परंतु आता साखर २४ ते २५ रूपये किलोंवर आली आहे. यात फारशी वाढ झालेली नाही.खोबऱ्यात ४० रूपयांची घटतीन महिन्यांपूर्वी खोबरे २०० रूपये प्रतिकिलो विकले जायचे. परंतु आता खोबऱ्याचे भाव १५० ते १६० रूपये प्रतिकिलो झाले आहेत.शेंगदाणे महागलेतीन महिन्यांपूर्वी शेंगदाणा प्रति ६० रूपये किलो होता. आता त्याच्या किंमती ८५ रूपयांवर आल्या आहेत. यात १५ रूपयांची वाढ झाली आहे. पुढील काळात शेंगदाणाच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे.बासमती तांदूळ झाला स्वस्तबासमती तांदूळ कायम ८० ते १२० रूपयांदरम्यान असतो. मात्र, यंदा तांदळाच्या किंमती घटल्या आहेत. ४० ते ५० रूपये प्रतिकिलो बासमती तांदूळ विकला जात आहे. यामुळे सर्वसामान्यांना काही काळ तरी बासमती तांदूळ खरेदी करणे बजेटमध्ये असणार आहे. पोहे ३० रूपये किलोवरून ३५ ते ४० रूपयांवर जाऊन पोहोचले आहेत. जवळपास ५ ते १० रूपयांची वाढ आहे.