शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

काळ्या बाजारात जाणारा गहू पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 00:53 IST

शहरापासून २ कि.मी. अंतरावर असलेल्या परभणी- औंढा राज्य रस्त्यावर शासनाच्या स्वस्त धान्य दुकानाचा माल काळ्या बाजारात विक्रीस घेऊन जात असताना पोलीस निरीक्षक डॉ.गणपत दराडे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलीस पथकाने वाहन रविवारी रात्री १० च्या सुमारास ताब्यात घेतले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔंढा नागनाथ : शहरापासून २ कि.मी. अंतरावर असलेल्या परभणी- औंढा राज्य रस्त्यावर शासनाच्या स्वस्त धान्य दुकानाचा माल काळ्या बाजारात विक्रीस घेऊन जात असताना पोलीस निरीक्षक डॉ.गणपत दराडे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलीस पथकाने वाहन रविवारी रात्री १० च्या सुमारास ताब्यात घेतले.सदर वाहनाची झाडाझडती घेतली असता वाहनचालकाने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. पोलीस निरीक्षक दराडे यांच्यासमवेत असलेले फौजदार साईनाथ अनमोड यांनी वाहनाची पुन्हा झडती घेतली असता त्यामध्ये स्वस्त धान्य दुकानातील गहू व तांदूळ असल्याचे आढळून आले. मालाची पोलिसांनी तपासणी केली असता त्यामध्ये एकूण १८ ते १९ कट्टे आढळले. त्यामुळे वाहन जप्त करुन औंढा पोलीस ठाण्यात लावण्यात आले. चालकाची बारकाईने चौकशी केली जात होती. या प्रकरणी गुन्हा नोंद करण्याची कारवाई उशिरापर्यंत सुरू होती. अजून काही माल आहे का? याचा परिसरात पोलीस शोध घेत होते. अधून मधून चोरीच्या घटना घडत असल्याने अनेक लाभार्थीही अन्नधान्यापासून वंचित राहत आहेत. त्यामुळे संबंधित विभाच्या अधिकाºयांनी लक्ष देणे गरजेचे आहे.