शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

गटबाजीचेही दणाणले ढोल

By admin | Updated: July 11, 2017 00:13 IST

बीड :सोमवारी शिवसेनेच्या वतीने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य शाखेसह मोंढा शाखेसमोर ‘ढोल बजाओ’ आणि थाळीनाद आंदोलन करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : भाजप सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी फसवी असून, शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा चालवली आहे. कर्जमाफीचा फायदा शेतकऱ्यांना झालेला नाही. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार सोमवारी शिवसेनेच्या वतीने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य शाखेसह मोंढा शाखेसमोर ‘ढोल बजाओ’ आणि थाळीनाद आंदोलन करण्यात आले. कर्जमाफीसाठी झालेल्या आंदोलनात गटबाजीचे ढोलही निनादले.जिल्हा बँकेच्या मुख्य शाखेसमोर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल जगताप, बाळासाहेब पिंगळे, माजी मंत्री बदामराव पंडित यांच्या उपस्थितीत ‘ढोल बजाओ’ आंदोलन करण्यात आले. सकाळपासूनच पदाधिकारी, शेतकरी आणि शिवसैनिक बँकेसमोर दाखल झाले. सरकारविरोधात फलक झळकावत मुख्यमंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. कर्जमाफीत पारदर्शकता आणावी, कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांची यादी जिल्हा बँकेच्या शाखेत प्रसिद्ध करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. जगताप, पिंगळे, पंडित यांनी शिवसेनेची भूमिका मांडत सरकारवर आरोप केले. या आंदोलनात जि.प.चे सभापती युधाजित पंडित, जिल्हा सचिव सुनील अनभुले, युवासेनेचे जिल्हाधिकारी सुशील पिंगळे, गणेश घुंबार्डे, गणेश वरेकर, उल्हास गिराम, रत्नाकर शिंदे, परमेश्वर सातपुते, जयसिंग चुंगडे, किशोर जगताप, नगरसेवक लक्ष्मण विटकर, संजय उडाण, अजय दाभाडे, बाळासाहेब अंबुरे, शिवराज बांगर सह शिवसैनिकांनी भाग घेतला. मोंढा डीसीसी शाखादरम्यान, बीड जिल्हा बँकेच्या मोंढा शाखेसमोर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी व शेतकऱ्यांनी थाळीनाद, ‘ढोल बजाओ’ आंदोलन केले. यावेळी सरकारच्या धोरणाविरुद्ध घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनात उपजिल्हाप्रमुख सचिन मुळूक, कुंडलिक खांडे, माजी आ.सुनील धांडे, चंद्रकांत नवले, विलास महाराज शिंदे, नारायण काशीद, संजय महाद्वार, शहरप्रमुख सुदर्शन धांडे, नवनाथ प्रभाळे, बाळासाहेब जटाळ, नंदू येवले, अशोक गडदे, वैजनाथ ढोरमारे, राजू शिंदे, आसाराम आमटे, रवींद्र गलधरसह शिवसैनिक व शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला.