शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

महामानवाला यंदाही घरातूनच अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:02 IST

औरंगाबाद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाही आपण सर्व मिळून विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची वैचारिक जयंती साजरी करू, गर्दी टाळून घरांतूनच ...

औरंगाबाद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाही आपण सर्व मिळून विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची वैचारिक जयंती साजरी करू, गर्दी टाळून घरांतूनच या महामानवाला अभिवादन करुयात, पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस उपायुक्त निकेश खाटमोडे पाटील यांनी केले.

आंबेडकर जयंतीनिमित्त पैठणगेट येथील पोलीस उपायुक्त परिमंडळ कार्यालयात दोन दिवसांपूर्वी सायंकाळी उपायुक्त निकेश खाटमोडे यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस प्रशासन व आंबेडकरी अनुयायांची संयुक्त बैठक झाली. यावेळी सहायक पोलीस आयुक्त भापकर, पोलीस निरीक्षक सचिन सानप, माजी उपमहापौर प्रकाश निकाळजे, दिनकर ओंकार, श्रावण गायकवाड, गौतम खरात, मुकुंद सोनवणे, दौलतराव मोरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी कार्यकर्त्यांनी नमूद केले की, भीमजयंती म्हणजे केवळ जल्लोष, असा गैरसमज करण्यात येतो. वास्तविक मागील अनेक वर्षांपासून समाजहिताचे उपक्रम तसेच प्रबोधनात्मक कार्यक्रमांनी भीमजयंती साजरी करण्याची परंपरा आंबेडकरी समूहाने जपली आहे. यंदाही कोरोनाच्या परिस्थितीला धीराने तोंड देण्याकरिता शासनाच्या निर्देशाचे काटेकोर पालन केले जाईल. कोरोनाचा संसर्ग होणार नाही, असे उपक्रम राबविण्यावर आमचा भर असेल. याशिवाय मिरवणूक न काढता शैक्षणिक उपक्रम, रक्तदान शिबिरे, कोरोना व लसीकरणाची जनजागृती करणे, ऑनलाईन उपक्रमातून विचारांचा प्रचार व प्रसार करणे आदी उपक्रम राबविण्याची ग्वाही जयंती उत्सव मंडळांच्या प्रतिनिधींनी बैठकीत दिली.

शासनाने काहीवेळ निर्देश शिथिल करून जयंतीच्या सजावटीचे साहित्य, फूल-हार खरेदीसाठी वेळ द्यावा, भडकलगेट येथे नियम व अटींचे पालन करुन अभिवादन करण्याची परवानगी द्यावी, शासनाने जर परवानगी दिली नाही अथवा निर्बंध कडक केल्यास जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक, मनपा प्रशासकांनी बाबासाहेबांना नागरिकांच्या वतीने अभिवादन करावे, अशा सूचना कार्यकर्त्यांनी केल्या.

यावेळी नागराज गायकवाड ,संदीप शिरसाठ, डॉ. जमील देशमुख, योगेश बन, अरुण बोर्डे, सचिन निकम, गुणरत्न सोनवणे, विजय वाहुळ, मुकुल निकाळजे, आनंद कस्तूरे, शैलेंद्र मिसाळ, श्रीरंग ससाणे, जयश्री शिर्के, सचिन शिंगाडे, प्रेम सोनवणे तसेच पोलीस कर्मचारी आदींची उपस्थिती होती.