शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
विमान कराचीला जाणार होते पण सौदी अरेबियाला कसे पोहोचले? पाकिस्तान एअरलाइन्सचा निष्काळजीपणा
4
नाशिकमध्ये महिलेने पतीचा झोपेतच दाबला गळा, हत्या करून फेकले जंगलात; गावात खळबळ
5
'तीन दिवसापूर्वीच कट रचला होता'; राधिका हत्या प्रकरणात मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा
6
समुद्र किनारी फिरताना सापडला गिफ्ट बॉक्स, उघडून बघताच बसला धक्का, थेट गाठलं पोलीस ठाणं, आतमध्ये नेमकं होतं काय?  
7
आतापर्यंत कुठे-कुठे फुटला ट्रम्प 'टॅरिफ बॉम्ब'? पाहा संपूर्ण यादी..; भारताबाबत मोठी अपडेट
8
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
9
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
10
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...
11
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
12
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
13
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
14
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
15
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?
16
Crime: कुराण शिकवण्याच्या नावाखाली घरी नेलं आणि...; सख्ख्या मावशीच्या कृत्यानं उत्तर प्रदेश हादरलं!
17
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
18
"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
19
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
20
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती

युवा पिढीकडून लैंगिक शिक्षणाला हिरवा कंदील

By admin | Updated: July 2, 2014 00:30 IST

नांदेड : बालक असो की युवा वर्ग, त्यांच्यापर्यंत अजूनही शास्त्रशुद्ध पद्धतीने लैंगिक शिक्षणाची माहिती पोहचत नाही़

नांदेड : बालक असो की युवा वर्ग, त्यांच्यापर्यंत अजूनही शास्त्रशुद्ध पद्धतीने लैंगिक शिक्षणाची माहिती पोहचत नाही़ तब्बल ८२ टक्के युवकांना मित्रच ती माहिती पुरवितात़ ६२ टक्के युवक इंटरनेटची मदत घेतात़ तर ३२ टक्के पुस्तके चाळतात़ त्यामुळेच वैद्यकीय तज्ज्ञ अन् सामाजिक कार्यकर्ते शास्त्रशुद्ध पद्धतीने शालेय व महाविद्यालयीन युवकांना लैंगिक शिक्षण दिले जावे याचा आग्रह धरत आहेत़ केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ़हर्षवर्धन यांनी लैंगिक शिक्षणाला विरोध दर्शविणारे वक्तव्य केले होते़ त्यानंतर पुन्हा एकदा या विषयावर मंथन सुरू झाले आहे़ त्याचाच एक भाग म्हणून महाविद्यालयातील युवक-युवतींकडून प्रश्नावलीद्वारे सर्व्हेक्षण करण्यात आले़ शाळा, महाविद्यालयात लैंगिक शिक्षण दिले जावे, याबद्दल जवळपास ७४ टक्के तरूण-तरूणींनी सहमती दर्शविली आहे़ त्यामध्ये ४२ टक्के मुले आणि ३२ टक्के मुलींची सहमती आहे़ तर २६ टक्के विरोध दर्शवितात़ पैकी ८ टक्के मुले तर १८ टक्के मुलींचा विरोध आहे़ आश्चर्य म्हणजे लैंगिक शिक्षणाची खुलेपणाने चर्चा व्हावी, असे वातावरण शाळा-महाविद्यालयात असत नाही, असे ७८ टक्के तरूण-तरूणींना वाटते़ याउलट २२ टक्के युवक-युवतींना शाळा-महाविद्यालयात योग्य वातावरण आहे, असे वाटते़ लैंगिक विषयावरील माहिती मिळविण्यासाठी मित्रांना जवळ करणारा वर्ग अधिक आहे़ केवळ १२ टक्के मुले-मुली आपल्या पालकांशी बोलू शकतात़ तर ८८ टक्के जणांचा पालकांशी संवाद होत नाही़ एकीकडे पालकांनी आपल्या मुलांशी मोकळेपणाने चर्चा करावी, असे असताना प्रत्यक्षात मात्र ८२ टक्के पालक आपल्या मुला-मुलींशी लैंगिक शिक्षणावर उघडपणे बोलत नाहीत़ केवळ १८ टक्के पालक बोलतात, असे मुलांनी सांगितले आहे़ लैंगिक शिक्षण शाळा-महाविद्यालयातून दिले जावे असा आग्रह धरणारी तरूण पिढी निश्चितच केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ़ हर्षवर्धन यांच्या मताशी सहमत दिसत नाही़ जवळपास ८० टक्के तरूण-तरूणींना आरोग्यमंत्र्यांनी लैंगिक शिक्षणाला विरोध दर्शविणारे केलेले वक्तव्य अयोग्य वाटले आहे़ महाविद्यालयीन मुले-मुली आक्षेपार्ह वेबसाईट वा साहित्य वाचतात का, याबाबत ४८ टक्के मुलांनी होय असेच उत्तर दिले़ त्यात १७ टक्के मुलींनी सुद्धा होकारार्थी उत्तर दिले आहे़ तसेच आक्षेपार्ह साहित्य वाचण्यासाठी ६२ टक्के युवक-युवतींना वाटते इंटरनेटचा वापर होतो, तर ३२ टक्के युवक-युवतींना वाटते पुस्तकेच उपयोगात आणली जातात़ तर ६ टक्के मुलांनी तटस्थ राहणे पसंत केले़ एकंदर लैंगिक शिक्षणाबद्दल युवा पिढी आग्रही असल्याचे सर्व्हेक्षणाद्वारे स्पष्ट झाले आहे़ अजूनही मुला-मुलींसमोर या विषयाचे सर्व्हेक्षण हासुद्धा दडपणाचा विषय असल्याचे जाणवले़ सर्व्हेक्षणावर नाव तसेच ओळख नमुद करायची नसल्यामुळे उघडपणे मुलींनी आपली मते नोंदविली़ त्याचवेळी हा विषय अजूनही उघडपणे बोललो तर मित्र-मैत्रिणी काय म्हणतील, वडील मंडळी नावे ठेवतील, अशीच भावना सर्व्हेक्षण फॉर्म भरुन देणाऱ्या बहुतांश युवक-युवतींची दिसून आली़ मात्र कुठेतरी हा विषय उघडपणे शिकविला जावा, अशी सुप्त इच्छा युवा वर्गाची दिसून आली़ (प्रतिनिधी)आई सजगलैंगिक शिक्षणावर ८२ टक्के पालक आपल्या मुलांशी मोकळेपणाने बोलत नाहीत़ मात्र १८ टक्के पालक मुलांशी बोलतात, हाच काय तो आशेचा किरण़ त्यातही ३ टक्के मुलांनाच असे वाटते की पालक मुलांशी बोलतात़ तर १५ टक्के पालक मुलींशी बोलतात, यावर मुलींनी होकारार्थी उत्तर दिले आहे़ म्हणजेच मुलांपेक्षा मुलींशी पालकांचा संवाद अधिक आहे़ पर्यायाने आई मुलींशी मोकळेपणाने चर्चा करते, ही बाब सर्व्हेक्षणातून समोर आली आहे़ बालकांची उत्तरे टाळू नका, तरूणांना विश्वासात घ्याबालकांनी विचारलेल्या प्रश्नांना टाळू नका़ चुकीची, अशास्त्रीय उत्तरे तर अजिबात देऊ नका़ आवश्यकता असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या़ तर किशोरवयीन मुला-मुलींच्या मनात निर्माण होणाऱ्या प्रेम, लैंगिक भावना या नैसर्गिक आहेत़ त्यांची जिज्ञासा कायम ठेवून उत्तरे द्यावीत़ युवक-युवतींना तर महाविद्यालयांमधून विविध कार्यशाळा व उपक्रमांमधून माहिती दिली पाहिजे़ ज्यामुळे अशास्त्रीय मार्गाकडे युवापिढी वळणार नाही़ परिणामी अभ्यास, व्यक्तिमत्त्व विकास, विविध खेळ, सांस्कृतिक नैपुण्य तसेच त्यांच्या आवडीच्या विषयांकडे अधिक लक्ष वळविणे शक्य होईल़ - डॉ़अशोक बेलखोडे (सामाजिक कार्यकर्ते)