शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

राशींच्या गमतीजमती आणि हास्याचा खळखळाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2016 23:58 IST

औरंगाबाद : मेष राशीच्या व्यक्ती कमालीच्या तापट असतात. त्यांना जर वृषभ राशीची पत्नी मिळाली तर त्यांच्या आयुष्यात कोणत्या गमतीजमती होतात, तसेच प्रत्येक राशीची कोणती गुणवैशिष्ट्ये आहेत,

औरंगाबाद : मेष राशीच्या व्यक्ती कमालीच्या तापट असतात. त्यांना जर वृषभ राशीची पत्नी मिळाली तर त्यांच्या आयुष्यात कोणत्या गमतीजमती होतात, तसेच प्रत्येक राशीची कोणती गुणवैशिष्ट्ये आहेत, त्यांच्या स्वभावामुळे कसे विनोदी प्रसंग पुढे उभे ठाकतात याची अनेक उदाहरणे देत ज्योतिषाचार्य विवेक म्हेत्रे यांनी ‘राशीकवच’ या कार्यक्रमातून सखींना पोट धरून हसायला भाग पाडले.प्रसंग होता कलर्स वाहिनी आणि लोकमत सखीमंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित धमाल विनोदी कार्यक्रम ‘राशीकवच’चा. या कार्यक्रमातून प्रसिद्धी ज्योतिषी विवेक म्हेत्रे यांनी राशींबद्दल माहिती देऊन प्रत्येक राशीबद्दल उपस्थितांना जागरूक केले. संत एकनाथ रंगमंदिर येथे सोमवारी सायंकाळी हा कार्यक्रम पार पडला. विवेक म्हेत्रे व रवि मसालेचे अजित जैन यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ याभोवती आपले आयुष्य फिरत असते. प्रत्येकजण आपआपल्या पद्धतीने तिन्ही काळांचा विचार करून पावले टाकत असतो. काल केलेल्या चुका आज करायच्या नाहीत आणि पुढे पण होऊ द्यायच्या नाहीत असे ठरवणारा प्रत्येक जण तिन्ही काळांचा विचार करीत असतो. पण हा विचार करीत असताना नेमका राशींचा प्रभाव त्याच्या जीवनावर कसा आणि केव्हा होतो, मनुष्याचा स्वभाव, त्याच्या आवडीनिवडी, त्याचा व्यवसाय, प्रगती, नोकरी, यश या सर्व गोष्टींवर त्याच्या कर्तृत्वाबरोबर त्याच्या नशिबाचा आणि राशींचा कसा प्रभाव पडतो, हेच नेमके या कार्यक्रमातून सांगण्यात आले. सखीमंच सदस्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घेतला.कलर्स चॅनल व लोकमत सखीमंच प्रस्तुत पुन्हा एकदा नवीन संकल्पना नवीन विषय घेऊन गोव्यासह संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या भेटीला आले आहेत. वेगळा विषय, वेगळी कथा, वेगळा बाज घेऊन हा कार्यक्रम प्रस्तुत झाला.वेगवेगळे विषय हाताळून प्रेक्षकांना नाविन्यपूर्ण कार्यक्रम देण्याचा प्रयत्न नेहमीच ‘कलर्स’ चॅनलतर्फे करण्यात येतो. ‘कवच’ या कलर्स चॅनलच्या नवीन धारावाहिक मधून परिधी आणि राजबीर या जोडप्याची कथा सांगण्यात आली. एक वाईट शक्ती मंजुलिका राजबीरच्या प्रेमात पडते आणि त्याला जिंकण्यासाठी पारिधीला संमोहित करते. परिधी मंजुलिकाच्या वाईट जादुतून बाहेर निघू शकेल का? परिधीचे प्रेम बनू शकेल का तिचे कवच काळ्या शक्तींपासून वाचण्यासाठी? जाणून घेण्यासाठी बघायला विसरू नका कलर्सची नवीन धारावाहिक ‘कवच’ दर शनिवारी आणि रविवारी रात्री ८ वाजता.कलर्स वाहिनीवर नव्याने सुरू झालेली मालिका ‘कवच काली शक्तीयोंसे’ यातील एक प्रसंग शीतल देठे व नीलेश सातपुते यांनी सादर केला. या मालिकेतील मुख्य कलाकारांची वेशभूषा करून सादर झालेला हा प्रसंग सखींना ही मालिका नियमितपणे पाहण्याची नवी ओढ लावून गेला.