शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

शेतजमिनी नसतानाही लाटले गारपिटीचे अनुदान

By admin | Updated: August 9, 2014 00:29 IST

लक्ष्मण दुधाटे पालम तालुक्यातील पोखर्णी देवी येथील काही लोकांनी शेतजमिनी नसतानाही अनुदान लाटले आहे.

लक्ष्मण दुधाटे  पालमतालुक्यातील पोखर्णी देवी येथील काही लोकांनी शेतजमिनी नसतानाही अनुदान लाटले आहे. तलाठी व कृषी सहाय्यकांनी गोरगरिब शेतकऱ्यांना वंचित ठेवत जमिनी नसणाऱ्यांचा अनुदानाच्या यादीत समावेश केला आहे. यामुळे दोषी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी पं. स. सदस्य नामदेव कदम यांनी केली आहे. पालम तालुक्यात २८ फेब्रुवारी ते १२ मार्च या दरम्यान अनेक ठिकाणी गारपीट झाली होती. या गारपिटीत शेतामधील उभी पिके आडवी झाल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी महसूल प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे केले होते. तालुक्यातील पोखर्णी देवी येथे तलाठी महाले, कृषीसहाय्यक होळगीर यांच्या पथकाने पिकांचे पंचनामे करून अनुदानासाठी यादी तयार केली होती. शेतकऱ्यांकडून पैसे उकळून या कर्मचाऱ्यांंनी अनुदानाच्या यादीत मोठ्या प्रमाणात खाडाखोड केल्याचा धक्कादायक प्रकार अनुदान वाटपाच्या वेळी ग्रामस्थांच्या लक्षात आला. नावामधील ३० ते ३५ लोकांच्या नावाने जमिनी नसतानाही हजारो रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे. परंतु खऱ्या गोरगरिब शेतकऱ्यांना मात्र अनुदानापासून चक्क वंचित ठेवण्यात आले आहे. यादी क्रमांक २५ मध्ये गट नं. ५७ दाखविण्यात आला आहे. परंतु संबंधितांच्या नावे या गटात जमीनच नाही. तसेच यादी क्रमांक १०० मध्ये सर्वे नं. १४८ दाखविण्यात आला असून अनुदान येणाऱ्यांच्या नावे जमीन नाही. तसेच यादी क्रमांक ९२ मध्ये सर्वे नं. १३१ आहे परंतु या सर्वे नंबरमधील जमीन पडीक असून जनावरांचा गोटा व शौचालय, उकिरडा असताना पीक दाखवून अनुदान देण्यात आले आहे. एकाच व्यक्तीला दोन-दोन वेळा अनुदान यादीत समाविष्ट करण्यात आलेले आहे. यादीत जागोजाग व्हाईटनर लावून खाडाखोड करीत बदल करण्यात आले आहेत. ग्रामस्थांनी वंचित शेतकऱ्यांना अनुदान देण्यात यावे, यासाठी उपोषणाचा इशारा दिला होता. प्रशासनाच्या आश्वासनानंंतर आंदोलन मागे घेण्यात आले होते. अजूनही शेतकऱ्यांना न्याय मिळालेला नाही.यामुळे जिल्हाधिकारी एस. पी. सिंह यांनी या प्रकरणात लक्ष घालून गोरगरिब शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी पं .स. सदस्य नामदेव भारत कदम यांच्यासह पोखर्णी येथील ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.