शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

रंगमंदिर सुरू करण्याचा ठराव मंजूर

By admin | Updated: December 11, 2014 00:31 IST

परभणी : शहराच्या सांस्कृतिक वैभवाचा साक्षीदार असलेल्या नटराज रंगमंदिराची दुरुस्ती करून ते सुरू करण्याचा ठराव बुधवारी स्थायी समितीच्या सर्वसाधारण सभेत एकमताने पारित करण्यात आला़

परभणी : शहराच्या सांस्कृतिक वैभवाचा साक्षीदार असलेल्या नटराज रंगमंदिराची दुरुस्ती करून ते सुरू करण्याचा ठराव बुधवारी स्थायी समितीच्या सर्वसाधारण सभेत एकमताने पारित करण्यात आला़ ‘लोकमत’ ने दहा दिवसांपासून लावून धरलेल्या हा प्रश्न तडीस जाण्याची आशा निर्माण झाली आहे़ बी़ रघुनाथ सभागृहात स्थायी समितीची बैठक सभापती विजय जामकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली़ बैठकीस उपायुक्त दीपक पुजारी, रणजीत पाटील, नगरसचिव चंद्रकांत पवार यांची उपस्थिती होती़ बैठकीत विषय क्रमांक २९ मध्ये शहरातील नटराज रंगमंदिराचा प्रश्न उपस्थित करण्यात आला़ रंगमंदिराची आधुनिक पद्धतीने दुरुस्ती करून बीओटी तत्वावर ते चालविण्याबाबत चर्चा करण्यात आली़ दुरुस्तीसाठी ३ कोटी ५४ लाख एवढा खर्च अपेक्षित असल्याचे शहर अभियंता रमेश वाघमारे यांनी सांगितले़ रंग मंदिरातील एसी बंद अवस्थेत असून, खुर्च्या तुटल्या आहेत़ रंगमंदिर पूर्वपदावर आणण्यासाठी अपेक्षित रक्कम कशी उभी करावी, यावर चर्चा करण्यात आली़ स्थायी समितीचे सभापती विजय जामकर यांनी सांगली बँकेकडे कर्ज मागणी केलेली आहे़, अशीही माहिती देण्यात आली़ शासनाच्या निधीतून किंवा बीओटी तत्त्वावर रंगमंदिराचे काम लवकरात लवकर सुरू करावे, असा शिवाजी भरोसे, मेहराज कुरेशी, व्यंकट डहाळे यांनी आग्रह धरला़ शहरातील स्थानिक कलावंतांसाठी रंगमंदिर दुरुस्त करून देणे ही मनपाची जबाबदारी असल्याचे उदय देशमुख यांनी सांगितले़ रंगमंदिराच्या दुरुस्तीबाबत स्थानिक कलावंतांनी प्रश्न लावून धरला आहे़ शनिवारी आ़ राहुल पाटील हे रंगमंदिराच्या अवस्थेची पाहणी करणार आहेत़ त्यानंतर स्थानिक कलावंतांचे शिष्टमंडळ पाटील यांच्या समवेत नागपूरला जाणार असून, मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचे कलावंत संघर्ष समितीने सांगितले आहे़ (प्रतिनिधी)