शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे प्रवासात आजोबांचा हृदयविकाराने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 00:45 IST

कन्नडमध्ये अंत्यसंस्कार : भांबावलेला नातू तीन तास एकटाच सोबतीला

कन्नड : कन्नड शहरातील समर्थनगर येथील रहिवासी शिवगीर भीमगीर गोसावी (६८) यांचे नासिक ते चाळीसगाव रेल्वे प्रवासादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. यावेळी त्यांच्यासोबत नऊ वर्षाचा नातू वेदांत होता. प्रवाशी व पोलिसांच्या सतर्कतेमुळे नंतर नातेवाईकांना बोलावून सोपस्कार पार पडल्याची घटना गुरुवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडली.आजोबा अचानक गप्प का झाले म्हणून त्याने हलवून पाहिले. परंतु ते काहीच प्रतिसाद देईना म्हणून वेदांत गोंधळला व त्याला रडू कोसळले. झाला प्रकार आजूबाजूच्या प्रवाशांच्या लक्षात आला. त्यांनी तात्काळ रेल्वे प्रशासन व पोलिसांना कळविले. वेदांतने आजोबांच्या खिशातून मोबाईल काढून वडिलांचा आणि आईचा मोबाईल क्रमांक शोधून देऊन पोलिसांना दिला. त्यानंतर पोलिसांनी वेदांतच्या वडीलांशी संपर्क साधून आजोबांना चक्कर आले असल्याचे सांगितले व गोसावी यांना मनमाड येथील दवाखान्यात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. दोन- तीन तासांच्या या धावपळीत भांबावलेला वेदांत वारंवार फोन करून वडिलांना परिस्थितीची माहिती देत होता. वेदांतचे वडील तेथे पोहचेपर्यंत दुपारचे दोन वाजले होते. तोपर्यंत आजोबांसोबत वेदांत एकटाच होता. वडील दिसताच त्याने हंबरडा फोडला. नातू, वडील आणि आजोबांची भेट झाली पण आजोबा जग सोडून गेले होते. आठ दिवस मुंबई येथील अभियंता असलेल्या मुलाकडे आजी -आजोबा दोन नातवंडांना सुट्टी होती म्हणून भेटावयास गेले होते. आजी आणि नात मुंबई येथे मुलाकडे सोडून आजोबा नासिक येथील मुलीकडे नातवासह एक रात्रीसाठी थांबले होते. सर्वांची भेट घेऊन ते परतत होते. दरम्यान काळाने यांच्यावर घाला घातला. ही भेट त्यांची अखेरची ठरली.दरम्यान, गोसावी यांचा मुलगा सचिन यांनी मनमाड येथील दवाखाना व पोलिसांचे शासकीय सोपस्कार पार पाडले आणि मग मृतदेह घेऊन सायंकाळी कन्नड गाठले. रात्री आठ वाजेच्या सुमारास गोसावी यांच्या पार्थिवावर कन्नडमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, तीन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. 

टॅग्स :Railway Passengerरेल्वे प्रवासीHeart Attackहृदयविकाराचा झटका