शहरं
Join us  
Trending Stories
1
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
2
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
3
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
4
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
5
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
6
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
7
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
8
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
9
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!
10
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
11
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
12
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
13
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
14
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
15
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
16
‘मोसाद’चे धाडसी ऑपरेशन्स आणि त्याची खासियत काय?
17
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
18
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री
19
राज्यात १० ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक
20
प्रतिभा अमेरिकेबाहेर पडते आहे? - वेलकम टू इंडिया!

अतिरिक्त गावांमुळे ग्रामसेवकांवर ताण !

By admin | Updated: July 1, 2014 01:03 IST

विठ्ठल कटके , रेणापूर रेणापूर तालुक्यात ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवकांची चार पदे रिक्त असून, एकेका ग्रामसेवकाला तीन-तीन गावांचा पदभार दिल्यामुळे त्यांच्यावर कामाचा अतिरिक्त ताण पडत आहे.

विठ्ठल कटके , रेणापूररेणापूर तालुक्यात ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवकांची चार पदे रिक्त असून, एकेका ग्रामसेवकाला तीन-तीन गावांचा पदभार दिल्यामुळे त्यांच्यावर कामाचा अतिरिक्त ताण पडत आहे. तर काही ग्रामसेवक दहा-दहा वर्षांपासून नेमणुकीच्या ठिकाणीच कार्यरत आहेत.रेणापूर तालुक्यात एकूण ६६ ग्रामपंचायती असून, ४२ सज्जे आहेत. रेणापूर, पोहरेगाव, कोष्टगाव, कारेपूर या ठिकाणी ग्रामविकास अधिकारी तर उर्वरित ग्रामपंचायतींवर ग्रामसेवक ग्रामपंचायतींचे दैनंदिन काम पाहतात. एकूण ३६ ग्रामसेवक सहा ग्रामविकास अधिकाऱ्यांमध्ये २२ पुरुष तर ११ महिला कर्मचारी आहेत. ६६ ग्रामपंचायतीला ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवकांची ६६ पदे असणे गरजेचे असताना केवळ ४२ कार्यरत आहेत. एक ग्रामविकास अधिकारी व तीन ग्रामसेवकांची पदे रिक्त आहेत. ३३ ग्रामसेवकांना दोन ते तीन गावांचा कारभार सांभाळावा लागतो. जर एखादा ग्रामसेवक रजेवर गेला, तर त्याही गावाचा कारभार अतिरिक्त दिला जातो. त्यामुळे कोणत्या ग्रामपंचायतीकडे कधी हजर रहायचे, यासाठी त्या ग्रामसेवकाला वार ठरवून घ्यावा लागतो. त्यामुळे गावातील दैनंदिन कामांना पर्यायाने दिरंगाई होते. एखाद्या व्यक्तीला एखाद्या प्रमाणपत्राची तातडीची गरज असेल, तेव्हा त्यांची मोठी अडचण होते. ठरलेल्या दिवसाची प्रतीक्षाच नागरिकांना करावी लागते. शिवाय, दोन-तीन गावांचा एका कर्मचाऱ्यावर अतिरिक्त भार पडल्यामुळे तो कर्मचारी त्रासून जातो. त्याने कोणत्या गावी वास्तव्य करावे, हाही त्याच्यासमोर प्रश्न उभा असतो.सेवाज्येष्ठतेचा नियम शिथिल करा...निवाडा-आंदलगावचे ग्रामसेवक ए.सी. उस्तुर्गे यांच्याकडे २२ डिसेंबर २००४ पासून याच गावचा पदभार आहे. त्यांच्याबाबत ग्रामस्थांकडून अनेक तक्रारी असतानाही त्यांची बदली होत नाही. तर दिवेगाव, माकेगाव, नरवटवाडीचे एस.ए. पवार, रामवाडीचे एस.व्ही. गुडे, तळणीचे राठोड हे ग्रामसेवकही आठ-आठ वर्षांपासून त्याच ठिकाणी कार्यरत आहेत. त्यांनी जर विनंती अर्ज केला तरच त्यांची बदली होते, असे समजते. सेवाज्येष्ठता नियम बदलीसाठी आड येतो, असे सांगण्यात येते. त्यामुळे हा नियम शिथिल करावा, अशी मागणी सरपंचांकडून केली जात आहे.